30 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रव्यापमं घोटाळ्यात ३१ आरोपी दोषी; सोमवारी शिक्षेचा फैसला

व्यापमं घोटाळ्यात ३१ आरोपी दोषी; सोमवारी शिक्षेचा फैसला

लय भारी न्यूज नेटवर्क

भोपाळ : संपूर्ण देशात मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळातील ( व्यापमं ) घोटाळा गाजला होता. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय कोर्टाने सर्व ३१ आरोपींना दोषी ठरवले आहे. २५ नोव्हेंबर सोमवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत ‘व्यापमं’ घोटाळ्याशी संबंधित २६ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर २०० हून अधिक संशयितांना अटक झाली होती.

व्यापमं घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सर्व ३१ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. हे सर्व आरोपी जामिनावर होते. मात्र कोर्टाने आज त्यांना दोषी ठरवल्याने या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. व्यापमंकडून झालेल्या प्री-मेडिकल टेस्टमधील गडबडीप्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या. पण जुलै २०१३ मध्ये इंदूर क्राइम ब्रँचने डॉ. जगदीश सगर यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आले.

या घोटाळ्याप्रकरणी सगर यांना मुंबईच्या एका आलिशान हॉटेलातून अटक करण्यात आली होती. त्यांच्या इंदूरच्या घरातून कोट्यवधींची कॅशही जप्त करण्यात आली होती. पोलिसांच्या मते, सगर यांनी ३ वर्षाच्या कार्यकाळात १०० ते १५० विद्यार्थ्यांना चुकीच्या मार्गाने प्रवेश दिला होता, हे त्यांनी मान्यही केले होते.

काय आहे व्यापमं घोटाळा

मध्य प्रदेशमध्ये पब्लिक सर्व्हीस कमिशन ज्या विभागात कर्मचारी भरती करत नाही त्या व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) द्वारे केल्या जातात

.
व्यापमं अंतर्गत प्री-मेडिकल टेस्ट, प्री-इंजिनिअरिंग टेस्ट आणि इतर अनेक सराकारी नोकरीच्या परीक्षा होता

ज्यांची परीक्षा देण्याचीही पात्रता नव्हती त्यांनी कॉन्ट्रॅक्ट टीचर्स, ट्राफिक पोलिस, सब इन्स्पेक्टर्स अशा परीक्षा देऊन ते पास झाले त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

सरकारी नोकरीमधील सुमारे १००० भरती आणि मेडिकल एक्झाममधील ५०० हून अधिक प्रवेश संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

या घोटाळ्याचा तपास मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निगराणीखालील एसआयटीने केला. त्यानंतर सीबीआयकडे ही चौकशी सोपवण्यात आली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी