33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकेंद्र सरकार फक्त आश्वासन देते; मदतीच्या नावाने बट्याबोळ

केंद्र सरकार फक्त आश्वासन देते; मदतीच्या नावाने बट्याबोळ

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. मात्र अजूनही केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. केंद्र सरकार फक्त महाराष्ट्राला आश्वासन देत आहे, मात्र मदत अध्यपही आलेली नाही (central government is only assuring Maharashtra).

संपूर्ण महाराष्ट्राभरात पावसाने थैमान घातला आहे. जनतेला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः जातीने लक्ष घालून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन मदत मागितली आहे, यावेळी मोदींनी मदतीचे आश्वासन दिले आहे (Chief Minister Uddhav Thackeray had a telephone conversation with Prime Minister Narendra Modi).

अजित पवारांचे केंद्र सरकारला साकडे

पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री तत्पर; भाजपचा मात्र मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 50 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाडच्या तळीये गाव, साताऱ्यातील आंबेघर गावात, तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या पोसरे-बौद्धवाडी आणि खेडच्या धामणंदमध्ये दरड कोसळून अनेक घरं गाडली गेली आहेत.

केंद्र सरकारचे फक्त आश्वासन

राज्यातील 3 जिल्ह्यातील या दुर्दैवी घटनांमुळे महाराष्ट्रावर भीषण संकट ओढावल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या या सर्व परिस्थितीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये फोनवर चर्चा झाली आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला मदतीचे आश्वासन देखील देण्यात आले आहे.

central government is only assuring Maharashtra
महापूर

केंद्र सरकार ही संपूर्ण देशासाठी असते, केंद्र सरकार सर्व राज्यांना मदत करत आहे, मात्र महाराष्ट्राची वेळ येते त्यावेळी केंद्र सरकार फक्त आश्वासन देत असते. महाराष्ट्र राज्यात मोदी सरकार नसल्यामुळे असे होत आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो (Is this happening because there is no Modi government in Maharashtra?).

चिपळूण – खेडमधील पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वायूदलाची कसरत

PM Modi dials Maharashtra CM Thackeray, assures all possible support to flood-hit state

तौक्ते वादळात मोदी सरकारची गुजरातला हजार कोटींची मदत

मे महिन्यात आलेल्या तौक्ते वादळामुळे देशभरात अनेक जिल्ह्यांचे नुकसान झाले होते. यावेळी सुद्धा मोदी सरकारने महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले होते. मात्र मोदी सरकारने गुजरातला तात्काळ मदत जाहीर केली होती.

19 मे 2021 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीचा हवाई मार्गाद्वारे पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी एक हजार कोटींची मदत जाहीर केली होती.

गुजरातला मदत केली, मग महाराष्ट्राला मदत का नाही? गुजरातमध्ये जास्त नुकसान झाल्यामुळे फक्त गुजरातला मदत केली की यामागे राजकीय हेतू आहे? हा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता (It only helped Gujarat that there is a political motive behind this).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी