32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रचिपळूण - खेडमधील पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वायूदलाची कसरत

चिपळूण – खेडमधील पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वायूदलाची कसरत

टीम लय भारी
रत्नागिरी : भारतीय नौदलाच्या मदतीनंतर आता भारताचे वायुदल (helecopter) सुद्धा पुरग्रस्तांच्या मदतीसाठी झेपावले आहे. (Indian air force to help people in ratnagiri district)

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि चिपळूण येथील पूर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून मदत येत आहे. अशावेळी भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर रत्नागिरीत मदतीसाठी पुढे आले आहे. (On 22nd July 1 aircraft flown to ratnagiri)

राज ठाकरेंचे महाराष्ट्र सैनिकांना आदेश, ‘पुरग्रस्तांना मदत करा’

चिपळूण - खेडमधील पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वायूदलाची कसरत
बचाव मोहीम

Breaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना

22 जुलै ला दुपारी दीड च्या सुमारास भारतीय वायुसेनेला मदतीसाठी मागणी करणारा मुखमंत्र्यांचा संदेश मिळाला. त्यानंतर मदतीची जुळवाजुळव करत मुंबई च्या हवाई तळावरून एमआय 17 आय व्ही नावाचे हेलिकॉप्टर रत्नागिरी साठी रवाना झाले.

दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी निघालेले हेलिकॉप्टर संध्याकाळी 5 वाजता रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचले. परंतु खराब वातावरणामुळे संध्याकाळनंतर कोणतीही बचाव मोहीम राबवता आली नाही. (Couldn’t help on 22nd because of bad weather)

 

helecopter
भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर
चिपळूण - खेडमधील पुरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी वायूदलाची कसरत
बचाव मोहीम

आज सकाळी बचाव मोहीम सुरू झाली. त्यावेळी मुंबईहून आलेले अजून एक हेलिकॉप्टर आणि एन डी आर एफ चे 10 जणांचे पथक मदतीला होते.

त्याच बरोबर 1 टन वजनाईतके सामान सुद्धा मुंबईहून रत्नागिरीस नेण्यात आले. (Aircraft took 1 ton of weight from Mumbai to ratnagiri)

रत्नागिरीस सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू झालेली बचाव मोहीम 2 माणसांना वाचवूनच थांबली. अशी माहिती इंडियन डिफेन्स पीआरओ नि ट्विटर मार्फत दिली.

फ्रान्स मधून भारतात येणाऱ्या लढाऊ विमानांना UAE वायुदलाने केली इंधनाची मदत

Jammu Air Force station blasts: Investigators probing possible use of drones

भारतीय वायुदलाची प्रत्येकी 2 हेलिकॉप्टर, एमआय 17 व्ही5 आणि एमआय 17 रत्नागिरीत कार्यरत आहेत.

त्याचबरोबर पुण्यात एक हेलिकॉप्टर मदतीसाठी तयार आहे. गरज पडल्यास ते मदतीसाठी तात्काळ उड्डाण करेल.

https://youtu.be/BDqZaPpZS54

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी