31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी दिलीपकुमारांना वाहिली श्रद्धांजली; रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला

उद्धव ठाकरेंनी दिलीपकुमारांना वाहिली श्रद्धांजली; रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला

टीम लय भारी

मुंबई :- अभिनय सम्राट दिलीप कुमार यांचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. दिलीपकुमार हे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे (Chief Minister Uddhav Thackeray paid tributes to Dilip Kumar).

दिलीपकुमार यांच्या मृत्यूची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी पोहचले. दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि इतर सहकारी होते. दिलीपकुमार यांच्या सारखा सर्वोकृष्ट अभिनेता आज देशाने गमावले आहे त्यांच्या जाण्याने ही पोकळी कधीच भरून निघणार नाही.

दिलीपकुमार यांची वयाच्या 98 व्या वर्षी प्राणज्योत मालवली

प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून प्रीतमताईंचे नाव वगळले!

भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे (The Chief Minister also said that Dilip Kumar place in the hearts of the fans will remain immortal).

Chief Minister Uddhav Thackeray paid tributes to Dilip Kumar
दिलीप कुमार

राणे, कपिल पाटील दिल्लीत मोदींच्या निवासस्थानी दाखल; दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे निश्चित

Legendary actor Dilip Kumar to get state funeral on Maharashtra CM Uddhav Thackeray’s orders

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारतीय चित्रपट सृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकिर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहमीच्या जगण्यातही त्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवला आणि वाढवला. मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध होता. कला क्षेत्राविषयीची आत्मियता हा अतूट धागा या दोघांमध्ये होता. अजरामर भूमिका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामरच राहील. त्यांच्या निधनामुळे रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली (A heartfelt tribute to veteran actor Padma Vibhushan Dilip Kumar).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी