32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयप्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून प्रीतमताईंचे नाव वगळले!

प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून प्रीतमताईंचे नाव वगळले!

टीम लय भारी

मुंबई :- अगदी कालपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशासाठी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव आघाडीवर होते. पण आज सकाळपासून हे चित्र पूर्णपणे पालटले आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांचे नाव वगळण्यात आले असल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे (Pritam Munde name was dropped from the cabinet expansion list).

प्रीतमताईंना यावेळच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी अपेक्षा सर्वच समर्थकांना होती मात्र त्यांच्या पदरी आता निराशा आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील काही अनपेक्षित चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. याउलट मराठवाड्यातील राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येत असल्याचेही आता जवळपास निश्चित झाले आहे.

राणे, कपिल पाटील दिल्लीत मोदींच्या निवासस्थानी दाखल; दोन्ही नेत्यांची मंत्रिपदे निश्चित

अजित पवार दाखवतात तिखट, पण स्थिती बिकट; निलेश राणे

तसेच धक्कातंत्र वापरत विधान परिषदेच्या निवडीच्या वेळी देखील पंकजाताई मुंडे यांचे स्थान निश्चित मानले जात होते, त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी देखील करण्यात आली होती, मात्र ऐनवेळी शेजारील लातूर जिल्ह्यातील रमेश कराड यांना अनपेक्षित संधी देत विधानपरिषद सदस्यत्व बहाल करण्यात आले.

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे केंद्रात मंत्री असताना अचानक एका अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्या द्वितीय कन्या डॉ. प्रीतमताई मुंडे-खाडे यांना स्वर्गीय मुंडेंच्या जागी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या, खरंतर त्याचवेळी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली म्हणून प्रीतमताई मुंडे यांना मोदी-शहांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यायला हवे होते. अशी भावना मुंडे समर्थकांची होती परंतु असे घडले नाही.

Pritam Munde name was dropped cabinet expansion list
पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे

ईडीचा फास एकनाथ खडसेंभोवती : जावई अटकेत

Pritam Munde’s name makes round for ministerial berth in Maharashtra

त्यानंतर आता होत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून महिलाना संधी मिळेल अशी चर्चा असताना आणि डॉ. प्रीतमताई मुंडे यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात असताना केंद्रातील भाजप सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरल्याने ताईंच्या समर्थांकामध्ये प्रचंड संताप व्यक्त होताना दिसून येत आहे.

भाजपने राज्याच्या राजकारणाबाहेरचे पद पंकजताईंना दिले तेव्हापासून त्यांना सक्रिय राजकारणापासून दूर ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे, त्यांच्याशी स्पर्धा करू पाहणाऱ्या बीड जिल्ह्यातील अन्य भाजप नेत्यांना पक्षाकडून दिली जाणारी ताकद ही त्याची सिद्धता मानली जात आहे. आणि आता एवढ्या चर्चा झाल्यानंतर प्रीतमताईंचे नाव मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतून वगळणे हे पुन्हा एकदा भाजपविरुद्ध मुंडे समर्थकांमध्ये रोष निर्माण करणारे ठरणार आहे (Munde is going to create anger among BJP supporters against the BJP)!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी