31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रCoronaeffect : परळीमध्ये अफवांचे पिक!

Coronaeffect : परळीमध्ये अफवांचे पिक!

टीम लय भारी

परळी : परळी शहरामध्ये अनेक भागात आणि गावांमध्ये कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्ण असल्याच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर फिरत होत्या. मात्र बीड जिल्ह्यातून आलेल्या अहवालानुसार परळी तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) रुग्ण नसल्याचे आरोग्य विभाग अधिका-यांनी सांगितले आहे. त्यामुळे परळीकरांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून घरीच राहा आणि सुरक्षित रहा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीड जिल्हात आजपर्यंत ४२४ निगेटिव्ह तर ०९ पॉजिटीव्ह, ७७ अहवालांची प्रतिक्षा

बीड जिल्ह्यात ७७ संशयितांचे स्वॅब (Coronavirus) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ५० स्वॅब हे कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे आहेत. यात इटकूरच्या रुग्णाच्या संपर्कातील आठ तर हिव-याच्या रुग्णाच्या संपर्कातील ४२ जणांचा समावेश आहे. तसेच, कोरोना (Coronavirus) बाधितांच्या संपर्कात नसलेले इतर कोरोना संशयितांचे २७ स्वॅब आहेत. या पैकी ४२४ निगेटिव्ह आहेत तर ०९ पॉजिटिव्ह असून ७७ अहवालांची प्रतिक्षा आहे, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी