32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रCoronaVirus : राजपुत्रालाही कोरोनाची लागण

CoronaVirus : राजपुत्रालाही कोरोनाची लागण

CoronaVirus ची लागण राजपुत्राला झाल्याने ब्रिटनमध्ये चिंता

टीम लय भारी

लंडन : कोणताही भेदभाव न करता ‘कोरोना’ ( CoronaVirus ) सगळ्यांना आपल्या कवेत घेत चालला आहे. गरीब, श्रीमंत, जात, धर्म, प्रांत असा कोणताही भेदभाव ‘कोरोना’ने ( CoronaVirus ) केला नव्हता. आता तर त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. चक्क राजपुत्रालाच त्याने मिठी मारली आहे.

ब्रिटनचे राजपुत्र चार्ल्स यांना ‘कोरोना’ची ( CoronaVirus )  लागण झाल्याचे आढळून आले आहे. ब्रिटनची राणी द्वितीय एलिझाबेथ यांचे चार्ल्स हे थोरले पुत्र आहेत. त्यांचे वय ७१ वर्षे आहे. ‘कोरोना’चे ( CoronaVirus ) हलके विषाणू त्यांच्या शरीरात आढळून आले आहेत. पण त्यांची तब्येत व्यवस्थित आहेत. सुदैवाने चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला (७२) या ‘कोरोना निगेटिव्ह’ आढळून आल्या असल्याची माहिती राजघराण्याकडून जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या काही आठवड्यांत चार्ल्स सार्वजनिक उपक्रमांमध्ये व्यस्त होते. त्यामुळे कोणाकडून ‘कोरोना’चा ( CoronaVirus ) विषाणू चार्ल्स यांच्याकडे संक्रमित झाला हे नक्की सांगता येणार नाही, असेही राजघराण्याने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.

राजपुत्र चार्ल्स हे राजघराण्याचे सध्याचे वारसदार आहेत. त्यांचे वय सुद्धा जास्त आहे. त्यांनाच ‘कोरोना’ची लागण झाल्याने ब्रिटनच्या जनतेमध्ये चिंता पसरली आहे. प्रिन्स चार्ल्स मुंबईकरांना चांगलेच ठाऊक आहेत. सन २००३ मध्ये ते मुंबईत आले होते. त्यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या कामाचे कौतुक केले होते. डबेवाल्यांचे व्यवस्थापन त्यांनी समजून घेतले होते. डबेवाल्यांना भेटण्यासाठी ते चर्चगेट स्थानकावर गेले होते. प्रिन्स चार्ल्स यांच्यामुळे मुंबईचे डबेवाले जगात प्रसिद्धीला आले होते.

Coronavirus , Prince Charles
सन २००३ मध्ये प्रिन्स चार्ल्स मुंबईमध्ये डबेवाल्यांना भेटले होते

राणी एलिझाबेथ यांच्याशी चार्ल्स यांची १२ मार्च रोजी भेट झाली होती. त्यावेळी राजपुत्र चार्ल्स यांनी आई असलेल्या राणी एलिझाबेथ यांच्यासोबत काही कल्याणकारी योजनांबाबत चर्चा केली होती. राणी एलिझाबेथ यांचे वय तब्बल ९३ वर्षे आहे. त्या सध्या विंडसर येथील त्यांच्या घरी सुखरूप असल्याचे राजघराण्याने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

Coronavirus चा अमेरिकेत उद्रेक : पंधरा दिवसांत 900 वरून 53 हजार रूग्णांची वाढ

Corona Effect : उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर बहिष्कार

भारत सरकारचे आवाहन : कोरोनावर सल्ला, विचार पाठवा

अमिताभ बच्चन यांचे कोरानाबद्दल आवाहन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी