29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus Pandemic : उद्धव ठाकरे यांना अनावृत्त पत्र

Coronavirus Pandemic : उद्धव ठाकरे यांना अनावृत्त पत्र

Coronavirus Pandemic : जागतिक महामारीत उद्धव ठाकरेंचे कार्य देशात उजवे ठरतंय

 

श्री. उध्दवजी ठाकरे,

मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य.

स. न. वि. वि.

आज आपला महाराष्ट्र प्रचंड भयानक परिस्थितीतून जात आहे. वैश्विक महामारीच्या ( Coronavirus Pandemic ) उंबरठयावर आहोत आपण सारे. पण उद्धवजी, आपण ज्या धीरोदत्तपणे ही परिस्थिती हाताळत आहात त्यासाठी आपणास सलाम.

हृदयाची मोठी शस्त्रक्रिया झालेली असताना, ताण तणाव सहन करायचे नसतानाही आपण अत्यंत संयमाने आणि निर्भीडपणे या परिस्थितीला ( Coronavirus Pandemic ) सामोरे जात आहात. आमच्या साठी सुरक्षेची यंत्रणा कवच म्हणून उभी करीत आहात. आजच्या घडीला तुम्ही आदर्श नेता आहात.

खरंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरची मला न आवडणारी व्यक्ती होता तुम्ही. त्यासाठी मी आपली

नम्रपणे क्षमा मागते.

पण कदाचित वेगवेगळ्या विचारधारा म्हणूनही असेल. तुमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचून मेंदूत घुसलेलं पुरोगामीपणही असेल कदाचित.

पण हे ही खरं आहे की, भिन्न विचारधारा असल्या तरी तुमचे वडील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मला भन्नाट आवडायचे. त्यांचं रोखठोक असणं, रोखठोक जगणं, रोखठोक बोलणं, आत बाहेर एकसारखं असणं. त्यांची सडेतोड वक्तृत्व शैली आणि तो दसरामेळावा. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारा शिवसैनिक हे माझ्या कुतूहलाचे विषय होते.

पण तुम्ही ?

तुमच्या वडिलांनी – बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यात महाराष्ट्राला मारलेली आर्त हाक ,” माझ्या उद्धवला सांभाळा ”

तेव्हा हे बापाचे पोटच्या पोराप्रतीच असलेलं प्रेम दिसलं आम्हाला..

पण आज बघतेय की, तुम्ही पोटच्या लेकरांसारखा महाराष्ट्र सांभाळत आहात. तेव्हा वाटतेय तुमच्या वडिलांचा बाळासाहेबांचाच निर्णय योग्य होता. माणसाला संधी मिळाली, की त्याच कर्तृत्व उसळी मारतं हेच खरं आहे आणि हे ही खरं आहे की, माझ्यासारख्या अनेकांना खोटं ठरवून तुम्ही तुमचं नेतृत्व   महाराष्ट्रालाच नव्हे तर या देशाला दाखवून दिलं आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्राला मोठया कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे.

स्व. श्री. वसंतदादा पाटील, श्री. शरद पवार, स्व. विलासराव देशमुख… अशी किती तरी नाव घेता येतील. हा वारसा जपत ह्या सर्वांच्यात आपलेही कर्तृत्व उठून दिसत आहे. याचंही भारी कौतूक वाटत आहे.

प्रचंड संयमी आहात. वागणं बोलणं तेवढंच संयमी. कोणताही बडेजाव नाही की,  ‘ मी मुख्यमंत्री ’ म्हणून मिरवणं नाही. आतून बाहेरून एक, बिल्कुल तुमच्या वडिलांसारखं.

पंधरवड्यापूर्वी जागतिक महिला दिनानिमित्त विधानसभेच्या अधिवेशनात तुम्ही पोटतिडकीनं केलेलं भाषण.. ‘ महिलांचा अपमान करणाऱ्यांना जर आम्ही सत्तेसाठी बरोबर घेणार असू तर,.. तर नाही पाहिजे मला असली सत्ता ..’

किंवा एका तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांना त्यांच्या खुर्चीत बसवून तुमचं उभं राहणं…

हे सारं माझ्यासहित महाराष्ट्रातील तमाम जनतेला भावत आहे… तुमचं मुख्यमंत्री म्हणून इतकं सहज असणंच आम्हाला भावत आहे…

आजच्या या भयानक परिस्थितीत ( Coronavirus Pandemic ) आपण महाराष्ट्र सांभाळत आहात.

तुमच्या हातात हा महाराष्ट्र सुरक्षित आहे, हा विश्वास तुम्ही वेळोवेळी दिला आहे..

आम्ही सारे तुमच्या बरोबर आहोत…

मुख्यमंत्री महोदय,  या अवकाळी ( Coronavirus Pandemic ) आलेल्या संकटाच्या काळात आपली स्वतःचीही काळजी घेत राहा

हा ‘कोरोना’ जाईल आणि महाराष्ट्राची विस्कटलेली घडी पुन्हा बसवावी लागेल. तेव्हाही सारा महाराष्ट्र आपल्या बरोबर असेल…

थांबते…

जय महाराष्ट्र !

प्रा. कविता म्हेत्रे,

म्हसवड,

ता. माण, जि. सातारा

हे सुद्धा वाचा

Corona Effect धक्कादायक : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणा-या आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांवर सामाजिक बहिष्कार

Lockdown : लॉकडाऊन काळात काय बंद?, काय सुरु?

मुख्यमंत्र्यांनी तहसिलदारांना खूर्चीत बसविले, अन् त्यांच्यासोबत फोटो काढला; तहसिलदार म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण

Video : कोरोना टाळण्यासाठी असे हात धुवा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी