31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रCoronavirus : मुंबईवरून शिरूरमध्ये आलेल्या एकाच घरातील तिघांना 'कोरोना'

Coronavirus : मुंबईवरून शिरूरमध्ये आलेल्या एकाच घरातील तिघांना ‘कोरोना’

संजय बारहाते : टीम लय भारी

टाकळी हाजी (शिरूर) : राज्यात कोरोनाची (Coronavirus) समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुंबईतल्या घाटकोपर येथुन कवठे येमाई, तालुका शिरूर येथे परतलेल्या चार लोकांपैकी तीन जणांचा कोरोनो अहवाल (Coronavirus) पॉजिटीव्ह आला आहे. विशेष म्हणजे त्यांना सोडण्यासाठी आलेला आंबेगाव (साकोरे) येथील त्यांच्या जावयालाही लागण झाली आहे. यामुळे जनतेमध्ये फार मोठे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडु नये, दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव पानगे यांनी केले आहे.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे यांनी सांगितले की, शुक्रवारी घाटकोपर येथुन दोन लहान नातींना घेऊन आजी व आजोबा आंबेगाव मधील साकोरे येथील जावयाच्या गाडीत बसुन रात्री कवठे गावात आले. त्यांना कवठे येमाई येथे सोडून हा जावई पसार झाला.

या आजी आजोबांचा मुलगा हा मुंबई येथे चालक असुन त्याला कोरोनोची (Coronavirus) लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही चाचणीसाठी आरोग्य विभागाने मुंबईतच ताब्यात घेतले. घरामधे राहणारी दोन मुली व आजी – आजोबा रात्रीत जावयाला सोबत घेऊन मुळ गाव असलेल्या कवठे येमाई ता. शिरूर येथे पोहचले. गावात ही वार्ता समजताच जागरुक ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना क्वारंटाईन केले. मात्र नंतर संशय आल्याने औंध येथे जिल्हा रुग्णालय येथे रविवारी पाठविण्यात आले. त्या चौघांपैकी आजी आजोबा व एका मुलीचा चाचणी अहवाल (Coronavirus) पॉजिटीव्ह आला आहे. तसेच जावई ही पॉजिटिव्ह आले. त्यामुळे कवठे येमाई परिसरातील जनतेमध्ये चिंतेचे वातावण निर्माण झाले आहे. तसेच गावी आलेल्या मुंबईकरांमुळेच शिरूरच्या पश्चिम भागात पहिले कोरोना रुग्ण (Coronavirus) सापडले आहे.

याबाबत तहशिलदार लैला शेख यांनी तत्काळ प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. सध्या मुंबई मधुन मोठ्या प्रमाणात लोक गावाला रात्री – बेरात्री कोणतीही परवानगी न घेता येत आहेत. ते प्रशासनाला सुद्धा माहीती देत नाहीत. चार दिवसांपुर्वी टाकळी हाजी मध्येही १२ जण मुंबईमधुन दाखल झाले. त्यांना तत्काळ ग्रामसेवक राजेश खराडे यांनी क्वांटाईन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी