31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रनगरसेवक गंगाधरे यांनी लिहिले शिवसेनेला पत्र

नगरसेवक गंगाधरे यांनी लिहिले शिवसेनेला पत्र

टीम लय भारी  

मुंबई : वरळी सिलेंडर स्फोट दुर्घटना प्रकरणी मुंबईतील नायर रुग्णालयांचा हलगर्जीपणा  पुन्हा एकदा समोर आला. उपचार न मिळाल्याने या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून विरोधी पक्षाने महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला धारेवर धरले आहे(Corporator Gangadhare wrote a letter to Shiv Sena).

वरळी सिलेंडर स्फोट घटनेतील चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात प्रशासन आणि डॉक्टरांच्या  हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या एक तासापेक्षा जास्त काळ डॉक्टरांनी कोणतेही उपचार न केल्यामुळे त्यातील छोट्या बालकाचा मृत्यू झाला होता. असा निष्काळजीपणा कसे करू शकतात यावरून विरोधी पक्षनेते सत्ताधारी शिवसेनेला  कठोर जाब विचारला.

कामावर जाण्यात एसटी कर्मचाऱ्यांचं हित, जे भडकवतायत ते कुटुंब जगवायला येणार नाहीत – संजय राऊत

शिवसेना मंत्री संदिपान भुमरेंच्या भावाची कार्यकर्त्याला मारहाण; रस्त्याची तक्रार केल्याचा राग, आठ जणांविरोधात गुन्हा

भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले असून महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना विपश्चनेचे  प्रशिक्षण देण्यात यावे तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागण्याचे बोलण्याचे  प्रशिक्षण देण्यावे. बेजबाबदारपणा आणि त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी रुग्णालयाला कायमस्वरूपी एक जबाबदार वैद्यकीय अधीक्षक 24 तास उपलब्ध असणे गरजेचे असते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारची घोषणा होती, त्याचे काय झाले? शिवसेनेचा सवाल

Shiv Sena, NCP eager to join hands for PCMC polls, Congress likely to go solo

आपत्कालीन प्रसंगी त्याने रुग्णालयात हजर राहणे गरजेचे असते. नायर रुग्णालयात हे अधीक्षक सायंकाळी 4 वाजे पर्यंतच असतात त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नाही, तुम्हीचा वरिष्ठ डॉक्टरांचा असा कारभार असल्यास इतर आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लोकांनी काय अपेक्षा ठेवायच्या असा सवालही त्यांनी विचारला आहे.तसेच स्थानिक नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने नागरिकांसाठी  रूग्णालयात उपचारासाठी उत्तम दर्जाची सुख सुविधा देण्याबाबत कार्यवाही व्हावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी