महाराष्ट्र

युवा पिढीला नशेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ड्रग्जविरोधी रणनिती : देवेंद्र फडणवीस

युवा पिढीला (youth) नशेच्या विळख्यातून सोडविण्यासाठी राज्यात येत्या काळात ड्रग्जविरोधात व्यापक अभियान (Anti-drug strategy) राबविण्यासाठी व्यापक रणनिती आखण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. नव्या सरकारमध्ये बदल्या व पोस्टिंगसाठी कुणाला भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे पोलिसांनी पारदर्शीक कारभार करावा असे आवाहन देखील यावेळी फडणवीस यांनी केले.राज्याची कायदा सुव्यवस्था आणि गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज पुण्यात बैठक घेण्यात आली यावेळी फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis Said Anti-drug strategy to free the youth from the scourge of addiction)

वाळू आणि दारुची तस्करी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, नशा निर्माण करणाऱ्या द्रव्यांबाबत पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका ठेवावी, असे आदेश देखील फ़डणवीस यांनी दिले. तपासावरील देखरेखीची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यात यावी, तसेच राज्यात विविध जिल्ह्यातील चांगल्या तपास पद्धतींचा पोलिस दलाने स्वीकार करावा, सागरी सुरक्षेच्या प्रस्तावांना तातडीने गती देण्याचेही निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले. राज्यातील उद्योगांना त्रास देणार्‍या संघटित गुन्हेगारीचा बिमोड करावा अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यास अजीबात मागे-पुढे पाहू नका, असे आदेश देखील फडणवीस यांनी यावेळी दिले.

हे सुद्धा वाचा

पुण्याचा शिवराज राक्षे झाला ‘महाराष्ट्र केसरी’

सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांची ब्रिच कॅन्डी रुग्णालयात घेतली भेट

112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा तातडीची मदत!

सोशल मीडियावरुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे त्याच्या वापराकडेदेखील लक्ष ठेवण्याची गरज आहे सोशल मिडियाच्या दुरुपयोगाकडेसुद्धा पोलिस दलाचे बारकाईने लक्ष असावे, असे सांगतानाच राज्यात अनेक ठिकाणी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आंदोलनाचं प्रमाण वाढत आहे. त्यानंतर ते आंदोलनाच्या पोस्ट सोशल मीडियावरदेखील टाकल्या जातात. त्यामुळे जातीय आणि धार्मिक तणाव कसे कमी करता येतील याकडे लक्ष देणार आहे. त्यासोबतच सायबर क्राईमकडे बारीक लक्ष देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

प्रदीप माळी

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

7 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

7 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

7 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

8 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

10 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

11 hours ago