33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांची ब्रिच कॅन्डी रुग्णालयात घेतली भेट

सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांची ब्रिच कॅन्डी रुग्णालयात घेतली भेट

राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात (Brich Candy Hospital) उपचार सुरू आहेत. शनिवारी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून अनेक नेते मंडळींनी देखील त्यांची रुग्णालयात जावून भेट घेत विचारपूस केली होती. (Supriya Sule met Dhananjay Munde at Brich Candy Hospital)

३ जानेवारी रोजी धनंजय मुंडे तदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री उशीरा परळीला निघाले होते. त्यावेळी चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात होऊन धनंजय मुंडे जखमी झाले होते. त्यांच्या बरकडीला मार लागल्याने त्यांना मुंबईतील ब्रिच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले होते.

हे सुद्धा वाचा

112 महाराष्ट्र: आता पोलिसांकडे व्हॉट्स ॲपनेही तक्रार करता येणार; सोशल मीडियातूनच मिळवा तातडीची मदत!

महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक होणार; मंत्री उदय सामंत यांचा जर्मनी दौरा यशस्वी

कामाची बातमी : घरमालकांना मोठा दिलासा अन् भाडेकरूंची कटकटीतून मुक्तता

दरम्यान धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या भगिनी आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील रुग्णालयात जावून धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तर सुप्रिया सुळे यांनी आज धनंयज मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी