28 C
Mumbai
Saturday, June 29, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंनी 'या' योजनेची वाढविली उंची !

धनंजय मुंडेंनी ‘या’ योजनेची वाढविली उंची !

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी खात्याचा कारभार हाती घेतल्यापासून शेतीच्या बांधावर जावून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी आता मोठी घोषणा केली आहे. राज्य सरकार फळबाग लागवडीसाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवित आहे. या योजने अंतर्गत 15 फळ पिकांचा समावेश करण्यात आला असून या अंतर्गत खड्डे खोदणे, ठिबक सिंचन आदी कामांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्याच सोबत आता या योजनेची व्याप्त वाढवून आवश्यक खतांसाठी देखील 100% अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.

फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते, त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार असून यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मंत्री मुंडे यांनी आज स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी घोषित केली आहे. आवश्यकता भासल्यास शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटर द्वारे दिली आहे.

हे सुद्धा वाचा 

महाराष्ट्र हे सर्वांना सामावून घेणारे राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार

देशात लोकसभा निवडणुकामध्ये कोणाचा बोलबाला; टाईम्स नाऊ -ईटीजीचा सर्वे

राज्य सरकारने 06 जुलै, 2018 रोजी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना राबविण्यास मान्यता दिलेली असून यांतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन 100% अनुदान देते. यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी 100% अनुदान दिले जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी