33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीचंद पडळकरांवर धनंजय मुंडेंनी साधला निशाणा, पवारांवरील टीकेचा घेतला समाचार

गोपीचंद पडळकरांवर धनंजय मुंडेंनी साधला निशाणा, पवारांवरील टीकेचा घेतला समाचार

टीम लय भारी

मुंबई : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला ‘कोरोना’ आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या वक्तव्याचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde slams to Gopichand Padalkar ) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

‘सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी डिपॉझिट व आस्तित्व टिकवा, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाहीत हे पाहा. बिरोबा तुम्हाला सद्बुद्धी देवो’ ( Gopichand Padalkar shouldn’t take wrong oath of Biroba ) अशा शब्दांत मुंडे यांनी आमदार पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Mahavikas Aghadi

धनगर समाजाने भाजपला मतदान करू नये, असे वक्तव्य करणारे भाषण आमदार गोपीचंद पडळकर यांनी बिरोबा देवस्थानाच्या प्रांगणात लोकसभा निवडणुकीत केले होते. त्यानंतर मात्र पडळकर विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

Corona update :  धनंजय मुंडे जिंकले, कोरोना हरला!  

Corona : धनंजय मुंडेंच्या प्रकृतीबद्दल राजेश टोपे काय म्हणाले…

गोपीचंद पडळकरांवर टीका करू नका : अजित पवार

पडळकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यात पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. याकडे खोचक शब्दांत धनंजय मुंडे ( Dhananjay Munde scathing on Gopichand Padalkar ) यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, शरद पवार हे बहुजन समाजाचा फक्त वापर करतात. धनगर समाजाच्या ते विरोधात आहेत ( Sharad Pawar is negative for Dhangar community). धनगर समाजाविषयी ते नकारात्मक आहेत. पवार हे महाराष्ट्राला लागलेला ‘कोरोना’ आहे अशी टीका पडळकर यांनी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी