28 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeटॉप न्यूजधक्कादायक : राज्यात ४८ तासांत १८५ पोलीस कोरोनाच्या जाळ्यात

धक्कादायक : राज्यात ४८ तासांत १८५ पोलीस कोरोनाच्या जाळ्यात

टीम लय भारी 

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरुच असून आहे. गेल्या ४८ तासांत राज्यात १८५ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर, दोन पोलिसांना कोरोनामुळे जीवं मृत्यू झाला आहे. आता पर्यंत राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ४ हजार २८८ वर पोहचली आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

कुटुंबियांपासून लांब राहून रात्रंदिवस पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु कोरोनोच्या विळख्याने पोलिसांना घेरल्यामुळे पोलीस दलात भितीचं वातावरण तयार झालं आहे. करोना लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी आपल्या जीवावर उदार होऊन, कर्तव्य बजवावे लागत आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावं यासाठी त्यांना रस्त्यावर सतर्क राहावं लागत आहे. मात्र, आता त्यांना देखील करोना संसर्ग मोठ्याप्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे.

राज्यात आढळलेल्या एकूण ४ हजार २८८ करोनाबाधित पोलिसांपैकी सध्या ९९८ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ३ हजार २३९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे ५१ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी