32 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयचंद्रशेखर बावनकुळेंनी गोपीचंद पडळकरांचे कान उपटले !

चंद्रशेखर बावनकुळेंनी गोपीचंद पडळकरांचे कान उपटले !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी कमालीचे संतप्त झाले. इतकेच काय खुद्द धनगर समाजातील काही नेत्यांनी देखील पडळकरांना धारेवर धरले. त्यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी गोपीचंद पडळकरांचे कान उपटले आहेत. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळेंनी पडळकरांना महायुती धर्माचे पालन करण्याचेच आदेश देत अजित पवार यांची क्षमा देखील मागितली.

बावनकुळे म्हणाले की, गोपीचंद पडळकर ज्या पद्धतीने अजित पवारांबाबत बोलले, हे संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भारतीय जनता पार्टी कधी ही विषयाचे समर्थन करणार नाही. महाराष्ट्र हे संस्कार, संस्कृतीचे राज्य आहे. विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा विरोधी पक्षातील लोकांशी आपले पटत नसेल तरी एका पक्षात राहून जरी आपले पटत नसेल महायुतीत राहुन जर एखाद्याचे विचार वेगळे असतील तुमचे मतभेद जर असतील तर मनभेद तयार करुन व्यक्तीगत टीका टिपण्णी करणे हे राज्याच्या संस्कृतीला धरुन नाही. भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला सुद्धा शोभणारे नाही. त्यामुळे अजित पवारांबद्दल जे विधान केले गेले त्याबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो.

पक्षीय राजकारणावर टीका होऊ शकते, व्यक्तीगट टीका करु नये, पडळकरांनी जे काही बोलले आहे, त्याबद्दल मी सुद्धा अजित पवारांना सांगेन त्यांनी मोठ्या मनाने पडळकरांना माफ करावे, असे अजित पवारांना बोलणार आहे. पडळकरांना आम्ही सांगितले आहे, यापूढे अशा पद्धतीचे वक्तव्य करु नये. बेजबादार विधान विधानपरिषद सदस्यांनी करु नये. भारतीय जनता पक्षाचे ते एक जबाबदार नेते आहेत, त्यामुळे त्यांना मी बोललो देखील आहे. परंतु खऱ्या अर्थाने अजित पवार यांचे जे मन दुखावले आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो.

हे सुद्धा वाचा 
धनगर आरक्षणावर अद्याप तोडगा नाहीच! सह्याद्रीवरील बैठक निष्फळ..
हमालांचा संघर्ष समजून घेण्यासाठी राहुल गांधी बनले हमाल !
3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

व्यक्ती जेव्हा जन्म घेतो, तेव्हा त्याला समाज लागतो. त्याला समाजाच्या समस्या मांडव्याच लागतात. समाजाला न्याय मिळवून द्यावाच लागतो. धनगर समाजामध्ये खऱ्या अर्थाने आज मागासलेपण आहे. धनगर समाज पिछाडलेला आहे. धनगर समाज मुख्यप्रवाहातून बाहेर आहे. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी पडळकरांची भूमिका महत्त्वाची आहे. परंतू राष्ट्र प्रथम आहे, पक्ष सर्वोच्च आहे, त्यामुळे पक्षात काम करताना पक्षाचे काम पक्षात करावे लागते. समाजाचे काम समाजात करावे लागते असे पडळकर म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी