30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी धनंजय मुंडे आक्रमक; शिंदे-फडणवीसांना पाठवले पत्र

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी धनंजय मुंडे आक्रमक; शिंदे-फडणवीसांना पाठवले पत्र

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) अंतर्गत मराठा समाजातील 50 वद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नोव्हेंबर 2022 पासून तो प्रस्ताव शासनाकडे धूळखात पडून आहे. त्यामुळे हा प्रस्तात तात्काळ मान्य करुन मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षातच शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

धनंजय मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे की, अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात शित्रणाची संधी मिळते, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना परदेशात शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे सारथी अंतर्गत मराठा समाजातील 50 विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय़ सरकारने घेतला होता. त्यानुसार सारथीने पदव्यूत्तर पदवी आणि पीएचडीच्या शिक्षणासाठी प्रस्ताव तयार करुन नोव्हेंबर 2022 मध्ये शासनाला पाठविला असल्याचे समजते.

मात्र हा प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्यामुळे या वर्षी (सन 2023-24) परदेशात शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबाबत संभ्रमाची स्थिती आहे. ‘क्यू एस’ च्या जागतिक क्रमवारी मध्ये पहिल्या दोनशे मध्ये येणाऱ्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देखील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती साठी अर्ज करता येत नाही व त्यातून विद्यार्थी आर्थिक विवंचनेत व नैराश्यात जाण्याची भीती आहे, असे धनंजय मुंडेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

त्यामुळे परदेश शिष्यवृत्ती बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने तातडीने मंजूर करून व याच शैक्षणिक वर्षात संबंधित पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या दृष्टीने लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करून अन्य प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईसह राज्यात बरसणार पावसाच्या सरी; हवामान खात्याचा अंदाज

वैष्णवांची ओळख असणाऱ्या तुळशीमाळेचा बाजार चीन काबीज करतेय

इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड; दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

स्टुडंट हॅल्पिंग हॅन्डस करणार उपोषण
दरम्यान राज्य सरकारने वारंवार मागणी व पत्रव्यवहार करून देखील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. सदर प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार तातडीने कार्यवाही न झाल्यास स्टुडंट हेल्पिंग हॅन्डस संघटनेच्या वतीने पुण्यात उपोषण करण्यात येणार असल्याचा ईशारा स्टुडंट हेल्पिंग हॅन्डस चे समन्वयक कुलदीप अंबेकर यांनी दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी