33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रकाकांच्या स्मृतिदिनी धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट

काकांच्या स्मृतिदिनी धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट

टीम लय भारी

मुंबई :- माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. काकांच्या स्मृतिदीनी धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट (Dhananjay Munde emotional post on his uncle’s memory).

गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले त्यांचे पुतणे व राज्याचे विद्यमान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले आहे. यावेळी, ऊततोड कामगारांसाठीची तुमची लढाई मी माझ्या खांद्यावर घेतली असून त्यांच्यासाठी आयुष्य वेचेन, अशा शब्दात आठवणी ‘अप्पा, ऊसतोड कामगार बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे.

गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश

काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार, नाना पटोलेंची स्पष्ट भूमिका

ऊसतोड कामगार बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन, हा शब्द देतो. आज तुम्ही नाहीत परंतु तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. अप्पा, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन;’ अशा शब्दात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मंत्रालयातील कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आदरांजली वाहिली. तो व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी एक ट्वीटही केले आहे. ‘अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो,’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘आज तुम्ही नाहीत परंतु तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. अप्पा, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन,’ असे ही त्यांनी पुढे म्हटले आहे.

मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने पुणे भाजपने एक कार्यक्रम आयोजित केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील त्यात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. ‘न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणे हे गोपीनाथरावांचे वैशिष्ट्य होते. जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आंदोलने केली. त्यातून संघर्ष यात्रा, कर्जमुक्ती यात्रा, कापूस दिंडी अशा वेगवेगळ्या आंदोलनांतून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला होता. कार्यालयातील भारतीय जनता पक्ष त्यांनी रस्त्यावर आणला. तिथून भाजप हा रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष झाला,’ अशा शब्दांत पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी