29 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रआधी डोनाल्ड तात्या! आता बायडेन भाऊ आणि कमला आक्का

आधी डोनाल्ड तात्या! आता बायडेन भाऊ आणि कमला आक्का

  • अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

राजकारणात आणि समाजकारणात असलेल्या व्यक्तींना काही खास टोपण नाव देऊन त्या माध्यमातून खुसखुशीत विनोद आणि किस्से करण्याचा उद्योग सध्या समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कधी कधी ते मोठ्या फलक अथवा होर्डिंग द्वारे झलकविण्यात येतात. मग त्यात शुभेच्छा फलक असला की धमाल येते. अशाच एका अफलातून फलकाची सध्या राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे.

पुणे तिथे काय उणे, या म्हणी प्रमाणे येथील भारती विद्यापीठ परिसरात लावण्यात आलेल्या एका मोठ्या फलकावर चक्क अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपाध्यक्षा कमला हैरिस यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या फलकावर सुरुवातीलाच ‘घासून नाय तर ठासून आलोय’ असे नमूद करत जो भाऊ बायडेन (Biden brother) आणि कमला आक्का हैरिस असा खास गावरान टच देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फलकावर शुभेच्छा देणा-याचे नाव असून ते पोपटराव खोपडे असे आहे.

अमेरिकेचे याआधीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्रम्प तात्या या नावानेच भारतीयांना खास ओळख होती. ट्रम्प तात्या या नावाने समाज माध्यमातून अनेक मिम्स तसेच व्हिडिओ तयार करण्यात आले होते. तर ट्रम्प यांच्या आवाजाचे मराठी डबिंग करून अनेक विनोदी व्हिडिओ आणि खास फिल्म तयार करण्यात आल्या आहेत. अनेक विनोदी स्किट मध्येही ट्रम्प तात्या हे पात्र नेहमी दिसले आहे. आता त्याचा पुढील अध्याय म्हणजे बायडेन भाऊ आणि कमला आक्का.

खरे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ काल बायडेन यांनी घेतली. त्यांच्या अभिनंदनाचे फलक अमेरिकेत लागले नसतील पण ते महाराष्ट्रात आणि खास करून पुण्यात लागले हेच विशेष…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी