30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रहिंगोली येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात

हिंगोली येथे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात

टीम लय भारी

हिंगोली :- हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन करून येत असतांना राज्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. वर्षा गायकवाड या सुखरूप आहेत. तसेच वर्षा गायकवाड यांचा वाहन चालकही सुखरूप आहे (Education Minister Varsha Gaikwad car accident at Hingoli).

दोन दिवसांपासून राज्य शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत.  हिंगोली दौऱ्यावर असताना वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअप टेम्पोची धडक बसल्याची घटना शहरातील पिपल्स बँकेजवळ आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती आहे. यात वर्षा गायकवाड यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.

वर्षा गायकवाडांच्या निर्णयावर अतुल भातखळकरांची घणाघात टीका

मनपावर मराठीसह हिंदुत्वाच्या मुद्याने भाजपचा झेंडा फडकवणार – आशिष शेलार

आज सकाळी अकरा वाजता शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलिला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. ताफा पिपल्स बँकेजवळ आला असता याच वेळी मोंढ्यातून भरधाव वेगाने एक पिकअप टेम्पो मुख्य रस्तावर येत होता. काही कळायच्या आत वर्षा गायकवाड यांच्या वाहनावर टेम्पो धडकला. वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग किंचित घासल्या गेला. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही.

Education Minister Varsha Gaikwad car accident at Hingoli
वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात

वर्ध्यात उदय सामंतांसमोर सेनेच्या दोन गटात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

https://english.lokmat.com/maharashtra/hingoli-maha-minister-varsha-gaikwad-survives-car-accident-unharmed/

वर्षा गायकवाड या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री असून हिंगोलीच्या पालकमंत्री देखील आहेत. हिंगोलीतील कामाचा आढावा घेण्यासाठी त्या कालपासून हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोलीतील नियोजित कार्यक्रमानुसार रामलीला मैदानापर्यंत जाण्यासाठी निघाल्या असताना वर्षा गायकवाड यांच्या गाडीचा अपघात झाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी