33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईमनपावर मराठीसह हिंदुत्वाच्या मुद्याने भाजपचा झेंडा फडकवणार - आशिष शेलार

मनपावर मराठीसह हिंदुत्वाच्या मुद्याने भाजपचा झेंडा फडकवणार – आशिष शेलार

टीम लय भारी

मुंबई :- राज्यातील राजकीय वर्तुळात रोज बदल होतांना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. यावेळी मराठी आणि हिंदुत्व मत एकत्र करुन मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवणार, असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले आहे (BJP flag will be hoisted on Mumbai Municipal Corporation said Ashish Shelar).

मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, एमएमआर महानगरपालिका या सगळ्यांमध्ये हिंदू मतांचे कैवारी आता भाजपचे राहील आहे, तसेच उत्तर भारतीयांची पहिली पसंती ही भाजप आहे. त्यामुळे मराठी आणि हिंदुत्व मत एकत्र करुन मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवणार, असे वक्तव्य आशिष शेलार यांनी केले आहे.

माळशिरसची एनसीपी कार्यकारणी बरखास्त; उत्तम जानकरांनी पक्षाकडे केली होती तक्रार

कोरोनानंतर देशात झिका व्हायरसचा शिरकाव; केरळमध्ये पहिला रुग्ण…

येणाऱ्या सर्व आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली रणनीतीसाठी गुपित आणि ओपन भेटीगाठी होणारच आहेत. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध असल्याने मोठे आव्हान तुमच्या समोर आहे. या प्रश्नवार आशिष शेलार म्हणाले, तिन्ही पक्ष एकत्र असूनही पंढरपूर निवडणूकीत कसे वाटोळे झाले हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्षाचे महावाटोळे होणार आहे. तिन्ही पक्ष एकत्र या, तरी आम्ही कोणालाही घाबरत नाही. जनतेकडे नम्रपणे जाणार पक्ष फक्त भाजपचे आहे. त्यामुळे जनता आम्हाला आशीर्वाद देईल असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

महापौर बसवणे एवढाच केवळ आमचा हेतू नाही आहे. महापौर तर बसवायचा आहे, मात्र याचा मुख्य हेतू वेगळा आहे. शिवसेनेकडे महानगरपालिका गेल्या 25 वर्षांपासून आहे. परुंतु रस्ते-खड्डेविना नाहीत, पाणी-गढूळ पाण्याविना नाही, रस्त्यावरच्या कचऱ्यावर प्रक्रिया नाही, सांडपाण्यावर प्रक्रिया नाही, रोज अग्निशमन दलाचे टॅक्स वाढत आहे. यांनी 25 वर्ष केलं काय? असा प्रश्न शेलार यांनी शिवसेनेला केला आहे. तसेच जनतेला आता शिवसेनेपासून सुटका हवी आहे. ही सुटका करण्यासाठी भाजप मैदानात उतरला आहे.

वर्ध्यात उदय सामंतांसमोर सेनेच्या दोन गटात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

mumbai: Ashish Shelar demands formation of SIT to review decision of appointment of administrators in 500 buildings

शिवसेनेकडे वन खाते तसेच राहून जर सर्वांनी मिळून जर विधानसभा अध्यक्षपद देत असतील तर घ्यावे, अन्यथा शिवसेनेने आपले मंत्रीपद सोडून अध्यक्षपद घेऊ नये असे मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. यावर आशिष शेलार म्हणाले की, एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला कोणतं खात द्यावं, अध्यक्षपद द्यायचं की नाही, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

मात्र, भास्कर जाधवांच्या या वक्तव्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, तिन्ही पक्ष एकत्र नाही, म्हणूनच ते अपेक्षा व्यक्त करत आहेत. एखाद्याल मी अध्यक्ष व्हावं अस वाटणे यात काय चूक आहे किंवा गैर नाही.

BJP flag Mumbai Municipal Corporation Ashish Shelar
आशिष शेलार

मात्र आमची यासंदर्भात अशी भूमिका आहे, की जो त्या पदावर बसेल त्याने निपक्ष राहावे. तसेच आजपर्यंतच्या विधानभवनाच्या आणि परिसरातील असलेल्या नियमांचा मान ठेवल अशा व्यक्तीला त्या पदावर बसवावे. भास्कर जाधवांकडून ती अपेक्षा आता राहिली नाही आहे. जाधव माझे मित्र आहेत, त्यासोबत ते कोकणवासी असल्यामुळे माझे त्यांच्यावर प्रेमही आहे. परंतु पक्षाच्या आदेशामुळे त्यांनी चूक केली आहे.

12 आमदारांचे निलंबन झाले असून जर अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर भाजप महाविकास आघाडीला आव्हान करेल का? या प्रश्नावर आशिल शेलार म्हणाले की, महाविकास आघाडीने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे धाडस केले पाहिजे. अध्यक्षपदाची आधी निवडणूक होऊ झाली की, मग आम्ही आमची रणनीती आखू असेही आशिष शेलार म्हणाले आहेत (Then we will work out our strategy said Ashish Shelar).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी