31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रलवकरच राज्यातील विद्यार्थ्यांना 'समान संधी केंद्राचा' मिळणार लाभ

लवकरच राज्यातील विद्यार्थ्यांना ‘समान संधी केंद्राचा’ मिळणार लाभ

टीम लय भारी

सी.बी.डी. बेलापूर : विद्यार्थ्यांनी योग्य ते समर्थन व योग्य ते शैक्षणिक पाठिंबा मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार लवकरच ‘ समान संधी केंद्र ‘ हा उपक्रम राबवणार आहे. या समान संधी केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांची गुणवत्तावाढीसाठी हे एक व्यासपीठ निर्माण होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी समान संधी केंद्र या उपक्रमाचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन डॉक्टर प्रशांत नारनवरे आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य केले आहे(Equal Opportunity Center, Soon students in the state will get the benefit it).

दिनांक 17/02/ 2022 रोजी बेलापूर येथील भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज कॉलेजमध्ये समान संधी केंद्राचे उद्घाटन डॉक्टर प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण, यांच्या हस्ते झाले. या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी डॉक्टर विलासराव कदम ,संचालक भारती विद्यापीठ, प्राचार्य डॉक्टर.अंजली कळसे, श्री अरुण माने, श्रीमती वंदना खोचरे, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण व मुंबई विभाग व श्री बलभीम शिंदे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ठाणे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक व सहाय्यक म्हणून काही विद्यार्थी त्यांची मदत घेऊन महाविद्यालयात ‘समान संधी केंद्र’ हा उपक्रम लवकरच सुरू करण्याचा निर्णय नुकताच सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे. या समान संधी केंद्रात विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच रोजगार प्राप्ती किंवा उद्योजकता व व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षण, पुढे जण्याबाबतचे शिक्षण देण्यात येणार आहे. शिवाय यसर्व समावेशक मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय संविधान घराघरात, मनामनात रुजवणार : वर्षा गायकवाड

धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय, 1 मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा सुरू होणार

Covid-19: Unvaccinated students can sit for Maharashtra board exams, say officials

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी