35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय, 1 मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा सुरू होणार

धनंजय मुंडेंचा महत्वपूर्ण निर्णय, 1 मार्चपासून दिव्यांगांच्या विशेष शाळा/कार्यशाळा सुरू होणार

टीम लय भारी

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिव्यांगांच्या शाळा विशेष काळजीसह चालू करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यात चालविल्या जाणाऱ्या दिव्यांग शाळा व कार्यशाळा आदी येत्या एक मार्चपासून शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून सुरू करण्यात याव्यात असे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत(Dhananjay Munde’ decision, Special school for disabled will start from March).

याबाबतचे शासन परिपत्रक 17 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच अन्य जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधून शालेय शिक्षण विभागाच्या 20 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे दिव्यांग शाळा सुरू करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

Dhananjay Munde' big decision, Special school for disabled will start from March
शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून सुरू करण्यात याव्यात असे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत

राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा व कार्यशाळा चालवल्या जातात. या शाळांची देशात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे कोविड संसर्गाच्या काळात या शाळा बंद होत्या, आता एक मार्चपासून या शाळा कोविड विषयक नियमांचे पूर्णपणे पालन करून सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Dhananjay Munde' big decision, Special school for disabled will start from March
एक मार्चपासून या शाळा कोविड विषयक नियमांचे पूर्णपणे पालन करून सुरू करण्यात येत आहेत

हे सुद्धा वाचा

पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी डीबीटी वर अर्ज करण्याकरिता मुदतवाढ

ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय पुणे व परळीत साकारणार, 3 कोटी रुपये निधी वितरित : धनंजय मुंडे

Nine ex BJP corporators from Navi Mumbai meet Sharad Pawar, may join NCP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी