30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंचा टोला, आता होणार काम, आता खरा राजूशेठ यांना लावावा लागणार...

एकनाथ शिंदेंचा टोला, आता होणार काम, आता खरा राजूशेठ यांना लावावा लागणार बॅनर!

टीम लय भारी

डोंबिवली : डोंबिवली येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी डोंबिवली एमआयडीसी विभागातील रस्त्यांकरीता 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र रस्त्यांबद्दल काम सुरु होत नसल्याने मनसेकडून वारंवार बॅनर लावून शिवसेनेला डिवचले जात होते. मनसेला शिवसेनेने चांगलेच प्रत्युत्तर देत कोणत्याही कामाला सुरु करण्यास काही पद्धत आणि नियम असतात असे सांगितले जात होते(Eknath Shinde scolds MLAs of MNS over Banner hoisting).

डोंबिवलीमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन झाले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना काम सुरु होतेय, आता तर बॅनर लावले पाहिजेत असे बोलत मनसेला चिडवले आहे.

त्यावर मनसेचे आमदार राजू पाटील म्हणाले, चांगले काम केले तर बोलायला काय हरकत आहे. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे. हा लोकांचा विजय आहे. काम सुरु झाले तर मी अभिनंदनाचा बॅनर लावणार. मात्र निधी मंजूर होऊनही काम सुरु होत नसल्याने मनसेकडून डिवचले जात होते. हे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदेंनी जाणली “इज ऑफ लिव्हिंग” पर्यायाची गरज

एकनाथ शिंदेंनी मानले मंत्री जयंत पाटील यांचे तब्बल १७ वर्षांनंतर आभार

Thane Guardian Minister Shinde assures Bhandarli villagers of scientific treatment of waste

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी