33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राठोडांनी राजीनामा दिला, आता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा : चित्रा वाघ

संजय राठोडांनी राजीनामा दिला, आता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा : चित्रा वाघ

टीम लय भारी

मुंबई : पुजा चव्हाणला न्याय मिळेपर्य़ंत आम्ही गप्प बसणार नाही. संजय राठोडांचा राजीनामा ही तर लढाईची सुरूवात आहे. संजय राठोडांवर एफआयआर दाखल व्हायला हवा ( FIR Should be lodge against Sanjay Rathod ), अशी मागणी भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुपारी भेट घेऊन त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला ( Sanjay Rathod given resignation to Uddhav Thackeray ). या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राठोड बंजारा समाजाला ढाल करीत आहेत. परंतु गुन्हेगाराला जात नसते. सुधाकर नाईक, वसंतराव नाईक अशी रत्न बंजारा समाजाने महाराष्ट्राला दिली आहेत. पण राठोड यांनी गुन्हेगारी कृत्य केले असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या ( Chitra Wagh scathing to Sanjay Rathod ).

पुजा चव्हाण ( Pooja Chavan death ) हीचा मृत्य झाल्यानंतर संजय राठोड 15 दिवस गायब होते. त्यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण द्यायला 15 दिवस का लावले. पुजा चव्हाण ही महाराष्ट्राची मुलगी आहे. स्वप्न बघायच्या वयात तिचा जीव जातो. यासाठी राठोड जबाबदार आहेत ( Sanjay Rathod responsible to Pooja Rathod death ). त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहीजे.

पुजा चव्हाण मृत्यूप्रकरणी ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवला त्यांच्यावरही कारवाई झाली पाहीजे. पैसा व सत्तेच्या जिवावर प्रकरण दाबले गेले नाही पाहीजे. महाराष्ट्राने देशाला नेहमी दिशा दिली आहे, असेही त्या म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी