33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयसंजय राठोडांना ठोकायचे अन् लटकवायचे असेच भाजपने ठरवलेय;  उद्धव ठाकरेंचा निशाणा

संजय राठोडांना ठोकायचे अन् लटकवायचे असेच भाजपने ठरवलेय;  उद्धव ठाकरेंचा निशाणा

टीम लय भारी

मुंबई : कायद्यानुसार तपास होण्याअगोदरच संजय राठोड यांच्या नावाने आदळआपट सुरू आहे. राठोड यांना काहीही करून ठोकायचे, त्यांना लटकवायचे आणि विधीमंडळाचे काम करू द्यायचे नाही असे भाजपने ठरविले असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला ( Sanjay Rathod punished by BJP ).

संजय राठोड यांनी आज दुपारी राजीनामा दिला. तो राजीनामा मी स्विकारला आहे ( Uddhav Thackeray accepted Sanjay Rathod’s resignation ). त्यामुळे वन खात्याचा कारभार तूर्त मी स्वतः पाहणार असल्याचे ठाकरे म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सडकून हल्लाबोल केला. महाराष्ट्राची सतत बदनामी करू नका. खोटे बोलून भाजप सत्तेवर आले, आणि आता देश विकायला निघाले असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना सुनावले ( Uddhav Thackeray scathing to Devendra Fadanvis ).

‘महाविकास आघाडी सरकार’ पडेल म्हणून स्वप्ने पाहात आहात. आता एक वर्ष झाले. पण सरकार पडलेले नाही. हे सरकार पडणारही नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले ( Uddhav Thackeray said, Mahavikas aghadi government will not derail ).

हे सुद्धा वाचा

संजय राठोडांनी राजीनामा दिला, आता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा : चित्रा वाघ

नरेंद्रभाई, ‘त्या’ शेतकऱ्यांना मारूनच टाका !

पुजा चव्हाण आत्महत्या ( Pooja Chavan suicide ) प्रकरणी भाजप आदळआपट करीत आहे. पुजा चव्हाण हीने आत्महत्या करताना कोणतीही चिट्टी लिहिलेली नाही. तिच्या आई वडीलांनी लेखी पत्र दिले आहे. आमच्या मुलीचा बळी गेला, पण त्यामुळे दुसऱ्या कुणाचा राजकीय बळी घेऊ नका. आमची व समाजाची बदनामी करू नका, अशी त्यांच्या आईवडीलांची मागणी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत गेल्या आठवड्यात खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. डेलकर यांनी लांबलचक चिट्टी लिहिली आहे. या चिट्टीत भाजपचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत. मोहन डेलकर ( Mohan Delkar suicide ) यांना न्याय मिळावा म्हणून भाजपचे नेते का आंदोलने करीत नाहीत, असाही सवाल ठाकरे यांनी विचारला.

पुजा चव्हाण हीची आत्महत्या दुर्दैवी आहेच. ही घटना घडली तेव्हाच त्याची निपक्ष चौकशी करण्याच्या सुचना मी पोलिसांना केल्या होत्या. पण चौकशी व्हायच्या आतच भाजपाने संजय राठोडांना ( Sanjay Rathod ) ठोकायचे ठरवून टाकले. तुमच्याकडे पुरावे असतील तर ते तपास यंत्रणांकडे द्या. पण तसे न करता तुम्हीच न्याय देण्याची भूमिका घेत आहात. तपास करू नका, पण संजय राठोडला संपवा ( Sanjay Rathod ) अशी भाजपची भूमिका आहे.

पुजा चव्हाण हीच्या मृत्यूनंतर तिची बदनामी केली आहे. बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे शक्य असल्यास ते सुद्धा करू, असे ठाकरे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी