35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रविठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणारे पाच वारकरी अपघातात ठार

विठू माऊलीच्या दर्शनासाठी जाणारे पाच वारकरी अपघातात ठार

बेळगाव : विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या वारकरींच्या टेम्पो आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला. यामध्ये पाच वारकरी ठार झाले. मृत वारकरी हे बेळगावातील मांडोळी व हंगरगा गावातले रहिवासी आहेत. हा अपघात शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे घडला आहे.

बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील लोक खासगी टेम्पोमधून कार्तिकी एकादशी निमित्त विठोबाच्या दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी विटाच्या भरलेल्या ट्रकने वारक-यांच्या टेम्पोला धडक दिली. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. मृतांत हंगरगा येथील एक तर मंडोळी येथील चौघांचा समावेश आहे. दोघे जण गंभीर असून इतर जखमींवर सांगोला आणि पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर बेळगावातील मंडोळी गावावर शोककळा पसरली आहे. वारक-यांवर काळाने झडप घातल्यामुळे विठूमाऊलीच्या दर्शनासाठी वारकरी पोहोचलेच नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी