31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रअयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल

लय भारी न्यूज नेटवर्क

धुळे : अयोध्येमधील वादग्रस्त जागेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा काहीही निकाल आला तरी लोकांनी शांतता राखावी, असे सरकारने आवाहन केले आहे. तरीही एका नागरिकाने फेसबुकवर चिथावणीखोर मेसेज पोस्ट करण्याचा फाजिलपणा केला. या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल
धुळे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचे पत्रक

धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय शर्मा नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. ‘श्रीराम मंदिर भूमीस न्याय मिळताच मी दिपावली साजरी करणार. एक कलंक मिटेल इतिहासाचा’ असे त्यात नमूद केले आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल
पोलिसांनी सामान्य लोकांसाठी जारी केलेले सुचना पत्रक

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही येवो. पण कुणीही वादग्रस्त मेसेज लिहू नये. आनंद साजरा करू नये. चितावणीखोर वक्तव्ये करू नयेत. फटाके वाजवू नयेत. गुलाल उधळू नये, अशा स्पष्ट सुचना पोलिसांनी जारी केलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह हिंदू व मुस्लीम धर्मातील संत – मौलवींनीही शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पण शर्मा याने आततायी मेसेज प्रसारित केला. त्यामुळे पोलिसांनी शर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी