30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी विचार करेल : छगन भुजबळ

शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादी विचार करेल : छगन भुजबळ

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : पंधरा दिवस उलटून गेले तरी शिवसेना व भाजपमधील सत्तासंघर्ष कायम आहे. शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रवादीकडून सकारात्मक विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवं आहे की उपमुख्यमंत्रिपद याचा निर्णय शिवसेनेने घ्यावा. तसंच शिवसेनेने हिंमत करून सत्तास्थापनेचा दावा करावा,” असं भुजबळ म्हणाले. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे, हे यापूर्वीच शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना मुख्यमंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद यापैकी काय हवं ते त्यांनी आधी ठरवलं पाहिजे, असे ते म्हणाले.

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने प्रस्ताव पाठवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस त्याचा नक्कीच सकारात्मक विचार करेल.

– छगन भुजबळ

सत्तासंघर्षावरून शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे राज्याला स्थिर सरकार सध्या तरी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी