30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशिर्डी, अक्कलकोटसह विविध मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

शिर्डी, अक्कलकोटसह विविध मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला खूप महत्व आहे. आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू संस्कृतीत गुरूला नेहमी उच्च स्थान देण्यात आले आहे. गुरूला देवासारखे मानले जाते. गुरुपौर्णिमेला किंवा व्यास पौर्णिमेला आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. आज 3 जुलैला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्रात शिर्डी, अक्कलकोटसह विविध ठिकाणी मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईभक्त शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर साईमंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या निमित्ताने शिर्डीमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. साईबाबांना गुरुस्वरूप मानणारे हजारो भक्त साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत.

गुरुपौर्णिमेच्या आजच्या मुख्य दिवशी काकड आरतीनंतर अखंड पारायण समाप्ती झाली. श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणाची मिरवणूक यावेळी काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये संस्थानाचे अध्यक्ष तसेच प्रधान जिल्हा न्‍यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तसेच जिल्हाधिकारी श्री. सिध्‍दाराम सालीमठ यांनी वीणा आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर (भा.प्र.से.) आणि वैद्यकिय संचालक ले. कर्नल डॉ. शैलेश ओक यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. साई समाधी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. साईबाबा बाळफकिराच्या रूपात ज्या निमवृक्षाखाली प्रकट झाले होते. त्या जागेला गुरुस्थान म्हणून ओळखले जाते. या निमवृक्षाला प्रदक्षिणा घालून भाविक गुरूला नमन करत साईनामाचा जयघोष करत होते. त्याने परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.

हे सुद्धा वाचा:

खासदारकीसाठी आनंद परांजपे अजित पवार यांच्याबरोबर गेले; ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना

राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रेनेचं छापेमारीचे सत्र सुरूच, एकाला अटक

बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काकावर डागले फोटोअस्त्र

शिर्डीसह अक्कलकोट आणि शेगाव येथे ही गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची गर्दी दिसून आली. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. स्वामी समर्थ हे दत्ताचा अवतार मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर शेगावात संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासून शेगावच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. शेगावमध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने राज्यभरातून दिंड्या दाखल झाल्या आहेत. तसेच विविध कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी