38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeटॉप न्यूजIAS होण्यापेक्षा आयुष्य अनमोल आहे, सनदी अधिकाऱ्यांनी तरूणांना सांगितला मंत्र

IAS होण्यापेक्षा आयुष्य अनमोल आहे, सनदी अधिकाऱ्यांनी तरूणांना सांगितला मंत्र

टीम लय भारी

पंढरपूर :- महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाने ‘इयत्ता दहावी आणि बारावी नंतरच्या पुढील शिक्षणातील संधी’ या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. दि. 21 जुलै ते 20 ऑगस्ट 2021 या कालावधीत फेसबुक पेजद्वारे दररोज सायंकाळी 7:30 वाजता या व्याख्यानमालेचे प्रक्षेपण होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी विभागीय आयुक्त पांडुरंग पोले आले होते (Life is more precious than being an IAS).  

यावेळी पांडुरंग पोले यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात “स्पर्धा परीक्षा ही जीवनातील एक संधी असून स्पर्धा परीक्षेत मिळालेल्या अपयशाने विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे असे ही ते यावेळी म्हणाले (He said that students should look at life in a positive light).

अखेर नाशिकमधील बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह सोहळा पार पडला

पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री तत्पर; भाजपचा मात्र मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

पुढे ते म्हणतात, स्पर्धा परीक्षेचा निर्णय विद्यार्थ्यांनी स्वतः निवडावा. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणी सक्ती करु नये. एका दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला जेवढी माहिती असते तेवढीच माहिती स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्याला असणे गरजेचे असते असेही ते म्हणतात.

पांडुरंग पोले म्हणतात खाजगी क्लासेस हे स्पर्धा परीक्षांसाठी एक फास्ट फूड सारखे असतात  त्यांच्यावर विद्यार्थ्यांनी सर्वस्व अवलंबून राहू नये. त्याचबरोबर ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रथम इंग्रजी भाषेचा न्यूनगंड दूर केला पाहिजे (Students living in rural areas should first of all overcome the English language deficiency).

Life is more precious than being an IAS
आयएएस

केंद्रीय मंत्र्यांची जीभ घसरली; शेतकऱ्यांना म्हणाल्या, ‘मवाली’

Meet IAS Varun Barnwal: Son of cycle mechanic who achieved 32nd rank in UPSC

राज्याचे आयुष्यमान योजनेचे कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हेदेखील यावेळी उपस्थित होते. ते विद्यार्थ्यांना म्हणतात, माणसाच्या आयुष्यात आनंद आणि समाधान या दोन गोष्टी महत्वाच्या असून करियर हे जीवन आनंदी करण्यासाठी असावे. तसेच विद्यार्थ्यांनी करिअरच्या संधी निवडताना स्वतःची आवड, गरज आणि शारीरिक क्षमता पाहून निर्णय घ्यावा.

या कार्यक्रमास चंद्रशेखर सोनवणे, डॉ. उषा देशमुख, डॉ. सुरेश येवले, डॉ. जे. पी. बघेल, ज्योती सरोदे, विक्रम पडळकर, प्राचार्य प्रमोद बिडे इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी बिरू कोळेकर यांनी परिश्रम घेतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी