32 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रशाश्वत ग्रामविकास या विषयावर चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शन

शाश्वत ग्रामविकास या विषयावर चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शन

टीम लय भारी

पुणे :  गावांचा विकास करणे म्हणजे फार अडचणी अशीच धारणा गावकऱ्यांची असते. पण या अडचणींवर मात करून सुलभपणे गाव विकास करता येतो. याबाबतच्या टिप्स देण्यासाठी निवृत्त IAS अधिकारी चंद्रकांत दळवी मार्गदर्शन करणार आहेत. ‘लय भारी’ न्यूज पोर्टलच्या ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून श्री. दळवी हे मार्गदर्शन करणार आहेत ( IAS Chandrakant Dalvi will be guide on rural development ).

चर्चेतील मुद्दे

१. गावांचा विकास कसा करावा ?

२. विविध विकास कामांसाठी निधी कशा पद्धतीने उपलब्ध करावा ?

३. शहरात स्थलांतरीत झालेल्या नोकरदारांनी गावाच्या विकासात कसे योगदान द्यावे ?

४. गाव विकासाचे घटक

५. गावातील कार्यकर्त्यांनी ग्रामविकासात सामुदायिक नेतृत्व कसे करावे ?

६. लोक सहभाग, लोक वर्गणी, श्रमदान यातूंन ग्रामविकास

IAS Chandrakant Dalavi will be guide on rural development

केव्हा ?

शनिवार, ७ नोव्हेंबर,

सायंकाळी ६ वाजता

स्थळ

‘लय भारी’ फेसबुक पेज https://www.facebook.com/LayBhari16News ( चर्चा पाहण्यासाठी या पेजला लाईक करा

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील ‘ते’ देखणं गाव पाहण्यासाठी हरियाणाच्या २५ अधिकाऱ्यांचा आज दौरा

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा होणार हायटेक, आदर्श गाव ‘निढळ’चे आणखी एक पाऊल

शरद पवारांकडून ‘रयत’वर आणखी एका IAS अधिकाऱ्याला संधी

श्री. चंद्रकांत दळवी यांची ओळख

श्री. चंद्रकांत दळवी ३५ वर्षे प्रशासकीय सेवेत काम करीत होते. पुण्याचे विभागीय आयुक्त, सहकार आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, अहमदनगर जिल्हा परिषदेचे सीईओ, तत्कालिन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यालयात सह सचिव आदी विविध पदांवर त्यांनी कामे केली आहेत.

उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करीत असतानाही त्यांनी आपल्या गावाच्या विकासाकडे प्रचंड लक्ष दिले. निढळ ( ता. खटाव, जि. सातारा ) हे त्यांचे गाव. दुष्काळ पाचवीला पुजलेला. त्यामुळे गावाची दयनीय स्थिती होती. पण श्री. चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी गावाचा कायापालट करून दाखवला आहे.

गावात जलसंधारणाची विपूल कामे झाली आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातही येथे पाण्याची कमतरता नसते. शेतीमध्ये आधुनिकता आणल्याने लोकांना हमखास उत्पन्न मिळते. गावात बँक, पतसंस्था आहे. मोठी बाजारपेठ तयार झालेली आहे. गावातील शाळा जिल्ह्यात नावाजलेली आहे. कमालीची स्वच्छता व देखणेपणा हे गावाचे वैशिष्ट्य आहे. स्वयंपूर्ण असलेल्या निढळची यशोगाथा पाहण्यासाठी देशभरातून लोक सतत येत असतात. गावात आल्यानंतर एखाद्या पर्यटनस्थळी पोचल्यासारखे वाटते.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी