29 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeमहाराष्ट्रपाकिस्तानला फुकट लस देता, मग राज्याला विकत का?, काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

पाकिस्तानला फुकट लस देता, मग राज्याला विकत का?, काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्र राज्यात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना लसीचा तुटवडा देखील निर्माण झाला आहे. केंद्र सरकारला कोरोना लस 150 रुपयांना मिळते. मग राज्य सरकारला ती लस 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराने का दिली जाते? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल (Congress questions Modi government)

दुश्मन राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला कोरोनाची लस फुकट दिली जाते, मग राज्याला 400 रुपये दराने का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Congress President Nana Patole) यांनी केला आहे. तसेच केंद्र सरकारने सर्वांना मोफत लस द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Nana Patole Comment on Corona Vaccine)

माजी IPS अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांची केली कानउघडणी

बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयातील सावळागोंधळ आणि रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणा-यांवर कारवाईची मागणी

नाना पटोले यांनी पुण्यातील विभागीय आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. पुण्यातील वाढती रुग्णसंख्या, लॉकडाऊन, कोरोनाचे निर्बंध यावर त्यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली (Strongly criticized the Modi government).

सर्वांना मोफत लस द्यावी

केंद्र सरकारला कोरोना लसीचा एक डोस हा 150 रुपये दराने मिळतो. पण राज्य सरकारला कोरोना लसीच्या प्रति डोससाठी 400 रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये दर आकारला जातो.

कोरोना काळात व्यापार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तसेच तुम्ही दुश्मन असलेल्या पाकिस्तानला फुकट लस दिल्या आहेत. मग राज्याला 400 रुपयाने का? असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मोफत कोरोनाची लस द्यावी, अशीही मागणी नाना पटोले यांनी केली.

Covid-19 cases rise in Kashmir but administration rules out lockdown

केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे देश अधोगतीला 

सिरम कंपनीने लसीच्या किंमतीत जो भेद करत आहे. त्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. जर लॉकडाऊन जर नसता तर आम्ही आंदोलन केले असते. देशाच्या पंतप्रधानांनी कोविड संकटाबाबतचे व्यवस्थित नियोजन केले असते, तर आज ही परिस्थिती आली नसती. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आपला देश अधोगतीला लागला आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

कोरोनावरुन लक्ष वेधण्यासाठी अनिल देशमुखांवर कारवाई 

कोरोनावरून दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर कारवाई केली जात आहे. आता लोकांचे जीव वाचवणे हे महत्त्वाचं आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

कोविशिल्ड लसीची किंमत किती?

18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यांना 50 टक्के साठा हा लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून थेट विकत घ्यायचा आहे. त्यानंतर सिरमने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी आपले दर जाहीर केले होते. त्यानुसार कोवीशिल्ड लस राज्यांना 400 रुपये तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना विकण्यात येईल.

‘Unilateral decision’: States are unhappy with Modi’s decision to pass buck on vaccine costs

सिरम इन्स्टिट्यूट सध्या केंद्र सरकारला 150 रुपयांत एक लस देत आहे. मात्र, हा करार संपल्यानंतर केंद्र सरकारलाही 400 रुपयांनाच लस विकली जाईल, असे सिरम इन्स्टिट्यूटकडून स्पष्ट करण्यात आले (Nana Patole Comment on Corona Vaccine).

 

विश्र्वसार्ह बातम्यांसाठी ‘लय भारी’ चॅनेला सबस्क्राईब करा.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी