36 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी IPS अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांची केली कानउघडणी

माजी IPS अधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांची केली कानउघडणी

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मुंबईचे माजी IPS पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी महाराष्ट्रातील कोरोन संकटात विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळावरून देवेंद्र फडणवीसांची कानउघडणी केली आहे (Former Mumbai IPS Commissioner of Police Julio Ribeiro has lashed out at Devendra Fadnavis over the confusion created by the Opposition in the Coronation Crisis in Maharashtra).

देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. पण सध्या मुख्यमंत्रीपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावले टाकली जात आहेत. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, असे ज्युलिओ रिबेरो म्हणालेत. रिबेरो यांनी एका वृत्तपत्रात मध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी कायदा दाखवत कान उपटले आहेत. Devendra Fadnavis ought to moderate his impulses says Julio Ribeiro).

रेमडेसिव्हीर प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये जाणे चुकीचे

ज्युलिओ रिबेरो यांनी देवेंद्र फडणवीस यांना कायदा दाखवला आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन तुटवड्या ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी आणले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा पोलीस स्टेशनला गेले (Devendra Fadnavis went to the police station late at night).

खरंतर रेमडेसिव्हीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे कोव्हिड संकटात केवळ राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. परंतु, तरी ही ब्रूक फार्माच्या पाच वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे.

गोंदवलेकर महाराज मंदीर ट्रस्टकडून पीएम केअर फंडाला 50 लाख, सीएम फंडाला मात्र घंटा, तरीही निलम गोऱ्हेंचा ट्रस्टवर वरदहस्त !

ब्रूक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ते गृहमंत्री असताना केलेला नियमच मोडीत काढला (Devendra Fadnavis broke the rule he made when he was Home Minister). राज्याच्या सुव्यवस्थेचे आणि कायद्याचे प्रतिक असलेल्या पोलीस ठाण्यात जाणे, त्याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घालणे, अधिकाऱ्यांची चढ्या आवाजात बोलणे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या पदाला साजेशा नव्हत्या (All these things were not suitable for the post of Devendra Fadnavis). देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा संयम गमावला, असे रिबेरो यांनी म्हटले आहे (Devendra Fadnavis lost his temper, Ribeiro said).

ज्युलिओ रिबेरो यांनी 1980 साली ते मुंबईच्या आयुक्तपदी असतानाचा एक किस्सा सांगितला. त्यावेळी वसंतदादा पाटील यांचे सरकार होते. तेव्हा सत्ताधारी काँग्रेस पक्षातील आमदार भाऊराव पाटील आणि ए.आर. अंतुले यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन तेथील प्रमुखांना शिवीगाळ केली होती. हा प्रकार मला समजला तेव्हा मी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच हे प्रकरण दंडाधिकारी न्यायालयसमोर मांडून भाऊराव पाटील यांना समन्स बजावण्याची मागणी केली.

जयंत पाटील यांनी सीबीआय धाडीचा नोंदविला निषेध

After criticism, Centre says its procurement price for vaccine remains Rs 150 per dose

त्यानुसार न्यायालयाने समन्सही जारी केले. पण, भाऊराव पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, जामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर भाऊराव पाटील यांनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क साधून हे प्रकरण बंद करण्याची मागणी केली. तेव्हा आमदाराने संबंधित अधिकाऱ्याची माफी मागितल्यास हे प्रकरण बंद करण्याची तयारी मी दर्शविली.

भाऊराव पाटील हे माझी म्हणजे आयुक्तांची माफी मागायला तयार होते पण त्या अधिकाऱ्याची माफी मागण्यास तयार नव्हते. मला हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्यानंतर हे प्रकरण मी मुंबईच्या आयुक्तपदी असे पर्यंत थंडच राहिले. पण, आतादेखील त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी, असे ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले (Devendra Fadnavis should apologize, said Julio Ribeiro).

‘फडणवीस उतावीळपणा करतायत, नसता धोका ओढवून घेतायत’

सध्या भाजप महाविकासआघाडी सरकारवर कुरघोडी करण्यासाठी टोकाला जाताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात भाजपचा हा प्रयत्न फसला. सचिन वाझे प्रकरणात भाजप काहीप्रमाणात यशस्वी ठरली. आतादेखील भाजपने तेच करण्याचा प्रयत्न केला. पण, सध्या लोकांच्या डोक्यात कोरोनाचा विषय आहे. त्यामुळे रेमडेसिविरचे प्रकरण एका मर्यादे पलीकडे ताणून धरणे मूर्खपणाचे आहे, असे ज्युलिओ रिबेरो यांनी म्हटले. लोकांना हा प्रकार फारसा रुचणारही नाही, असा इशाराही रिबेरो यांनी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी