33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोरोनामुळे भारत-पाकिस्ताना सामना लांबणीवर!

कोरोनामुळे भारत-पाकिस्ताना सामना लांबणीवर!

टीम लय भारी

मुंबई :-  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावामुळे आणखी एक मोठी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका भारत-पाकिस्तान (India-Pakistan) या देशांतील चाहत्यांना बसला आहे. कोरोनामुळे भारत-पाकिस्ताना सामना लांबणीवर गेला (Corona postponed the India-Pakistan match).

भारतात सुरू असलेली इंडियन प्रीमिअर लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यात भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह आहे. ही स्पर्धा UAE ला खेळवण्याच्या पर्यायाचा विचार सुरू झाला आहे. त्यात या कोरोनामुळे (Corona) आणखी एक मोठी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका भारत-पाकिस्तान (India-Pakistan) या देशांतील चाहत्यांना बसला आहे.

मोदी फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत का? त्यांचा इतर राज्यांशी संबंध नाही का? : पृथ्वीराज चव्हाण

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावरून फडणवीसांना रोहित पवारांचे चोख प्रत्युत्तर

कोरोना (Corona) व्हायरसमुळे यंदाही आशिका चषक ट्वेंटी-२० स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यात श्रीलंकेत ही स्पर्धा होणार होती, परंतु श्रीलंकेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे तेथील प्रशासाने हा मोठा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीही कोरोनामुळे (Corona) ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती आणि सहभागी सदस्यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती पुढे घेताच आली नाही. गतवर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची पूर्वतयारी म्हणून सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार होती. पण, ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कपच रद्द करावा लागला आणि त्यानंतर बीसीसीआयने त्या कालावधीत आयपीएलचे १३वे पर्व यूएईत खेळवण्याचा निर्णय घेतला.

Invisible in the pandemic fires, a slow burn of hunger and distress across India

दरम्यान, ही स्पर्धा रद्द झाल्याचे अधिकृत वृत्त अद्याप आलेले नाही. परंतु, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कार्यकारी अॅश्ली डी सिल्व्हा यांनी यंदा ही स्पर्धा खेळवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण आशियात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढतेय, शिवाय श्रीलंकेत एवढ्या संघांची राहण्याची सोय करणे सद्यस्थितीत अवघड आहे, त्यामुळे स्पर्धा घेणे अवघड आहे. २०२३ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचे संकेत ही सिल्व्हा यांनी दिले.

श्रीलंकेने बुधवारी १० दिवसांसाठी परदेशातून येणाऱ्या सर्व विमानसेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेचा राष्ट्रीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर वन डे मालिकेसाठी गेला आहे. जूलै महिन्यात श्रीलंका-भारत यांच्यात तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी