32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रइंडिया विरुद्ध भारत वादात आदित्य ठाकरे केंद्र सरकारवर संतापले

इंडिया विरुद्ध भारत वादात आदित्य ठाकरे केंद्र सरकारवर संतापले

देशात आता इंडिया विरुद्ध भारत ह्या नव्या वादाला तोंड फुटले आहे. G20 परिषदेच्या एक निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या नावाखाली President of Bharat असा उल्लेख केल्याने ‘इंडिया की भारत’ ह्या चर्चेला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान संसदेचे एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून देशाचे नाव इंडिया ऐवजी भारत करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरुन देशात दोन गट पडले असून सामान्य लोकांपासून राजकीय नेते, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि खेळाडू यांनीही या वादात उडी घेतली आहे.

यातच, आता शिवसेना उबाठा गटाचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या वादात उडी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी भारत विरुद्ध इंडिया वादाबद्दल व्यक्त होत म्हंटले, “मला आमच्या देशभक्त सहकारी राजकीय पक्षांचे अभिनंदन करायचे आहे. ‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून ‘खेलो इंडिया’, ‘फिट इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’ अशा घोषणांमध्ये व्यस्त असलेल्या सरकारला ‘जुडेगा भारत-जीतेगा इंडिया’च्या निमित्ताने आठवण करून दिली की आपल्या देशाचे नाव भारत आहे, आणि इंडिया देखील!”

पुढे केंद्र सरकारवर टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले, “आता विचार करण्याची गरज आहे की चीनने जी भूमी आपल्याकडून हिसकावून घेतली आहे ती भूमीही भारताचीच आहे आणि जी-20 साठी पडद्याआड ज्यांना लपवले गेले तेही भारतीयच आहेत. यातना भोगणारा काश्मिरी पंडितही भारतीयच आणि अत्याचार सहन करणाऱ्या मणिपूरच्या महिलाही भारतीयच!”

“आमचा राजकीय लढा या भारताच्या लोकशाहीसाठी आहे, तो या देशाच्या संविधानासाठी आहे! आम्ही आमच्या देशातील एकता, शांतता, प्रगती आणि अखंडतेसाठी उभे आहोत! अभिमान आहे भारतीय असल्याचा, इंडियन असल्याचा! वंदे मातरम! जय हिंद!” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या देशबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

हे ही वाचा 

१९ सप्टेंबरपासून नव्या संसद भवनात सुरू होणार कामकाज, निवडला गणेश चतुर्थीचा मुहूर्त

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाले कमलेश सुतार ?

BMC मध्ये सत्तेत आल्यास 100 युनिट पर्यंत वीज मोफत देणार; ‘या’ नेत्याची मोठी घोषणा

आता हा भारत विरुद्ध इंडिया हा वाद किती विकोपाला जातो ते पहावे लागेल. जर येणाऱ्या अधिवेशनात देशाचे नाव ‘भारत’ करण्याची शक्यता असून तसे अध्यादेश सरकारने दिले तर त्याचे विविध पडसाद उमटू शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी