38 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeमुंबईBMC मध्ये सत्तेत आल्यास 100 युनिट पर्यंत वीज मोफत देणार; 'या' नेत्याची...

BMC मध्ये सत्तेत आल्यास 100 युनिट पर्यंत वीज मोफत देणार; ‘या’ नेत्याची मोठी घोषणा

वंचित बहुजन आघाडी जेव्हा मुंबई महापालिकेत जाईल, तेव्हा अदानीच्या ह्या कारभाराला उचलून आम्ही मुंबईच्या बाहेर फेकून देऊ! आम्ही महापालिकेत सत्तेवर आलो तर जनतेला १०० युनिट पर्यंत वीज बिलं मोफत करू अशी घोषणा यावेळी सुजात आंबेडकर यांनी केली. अदानी इलेक्ट्रिसिटी पॉवरकडून दरवाढ आणि वाढीव वीजबिले पाठवून केल्या जाणाऱ्या आर्थिक लुटीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबईत धरणे आंदोलन केले.

यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी- अमित शहा देश विकायला निघाले आहेत, आपल्याला देश विकण्यापासून थांबवायचा आहे. नरेंद्र मोदी पब्लिक सेक्टर अदानीच्या घशात घालताय. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर नेहमी म्हणातात की, मोदी हा देश दारुड्या सारखा विकायला लागलेय. राहुल गांधी संसदेत अदानी आणि मोदींचा फोटो दाखवतात पण, त्यांचे मित्र असलेले शरद पवार यांचा अदानी सोबतचा सिल्वर ओक, गच्चीवरचा फोटो का दाखवत नाही ? आमची प्रमुख मागणी आहे की, जे वाढीव बिलं दिलेले आहेत ते त्यामध्ये जनतेला ५० % सूट द्यावी ! अदानींनी जे वाढीव बिलं दिले आहेत त्यांना आम्ही फाडून निषेध करतो!”

यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, “अदानीच्या वीज मीटरमध्ये दोष आहे, तर याचे नुकसान जनतेनी का भरावे? आधी वीज मीटर सरकार स्वतः सगळी प्रक्रिया करून घरी मिटर फिट करून देत होते पण, आता अदानी इलेक्ट्रिसिटी आल्यापासून लोकांना ना हरकत प्रमाणपत्र स्वतः आणून स्वतः मीटरसाठी अदानी पॉवर कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहे. अदानीकडून मीटर काढून बेस्टकडे परत इलेक्ट्रिसिटी मीटर देण्यात यावे, असे सुजात आंबेडकर म्हणाले.
सुजात आंबेडकर म्हणाले की, “बेस्ट असताना शंभर युनिट्सकरिता जेव्हढे बिल यायचे आता अदानीमार्फत त्याच्या दुप्पट बिल येतं. आरे कॉलनीमध्ये मिटर लावण्यासाठी सीईओकडे ना हरकत प्रमाणपत्र करिता जावे लागते. यांच्या बेशिस्त वागण्यामुळे आरे कॉलनीतील ६० टक्के लोकांच्या घरी अद्याप मीटर नाही. अदानी पावरने लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील सिद्धार्थ नगर भागात जवळपास 5 हजार गरीब लोकांचे कनेक्शन बंद केले होते.

हे सुद्धा वाचा 
सनी देओल-अमिषा पटेलच्या आयुष्यात भाग्योदय; गदर 2 ची 500 कोटींची कमाई
जिनिलिया देशमुखचे मन मुलांसाठी होतयं कासावीस
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मृणाल गांजळेंचे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेलांनी केले होते कौतुक

या आंदोलनात उपनगरातील जनतेची लूट थांबवावी, अदानी ऐवजी बेस्टची सेवा उपलब्ध करावी, वाढीव बिले ५०% माफ करावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यावेळी अदानी मीटर ची प्रतीकात्मक दहीहंडी थर लावून फोडण्यात आली. मोठ्या संख्येने मुंबईकर या आंदोलनात सहभागी झाले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी