30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रयोग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी राहा; योग दिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी राहा; योग दिनी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जगभरात 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. ज्याचा उद्देश योगाच्या विविध फायद्यांचा आणि त्याच्या सर्वांगीण कल्याणासाठी-शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सर्वांगीण दृष्टिकोनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी योग दिन साजरा करतात. तुमचे यश तीन गोष्टीने मोजले जाते.धन, प्रसिद्धी आणि मन:शांती.धन आणि प्रसिद्धी तर कोणीही मिळवतो.परंतु मनाची शांती फक्त योग केल्यानेच प्राप्त होते. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना मांडली होती.धकाधकीच्या जीवनामध्ये योग ही काळाची गरज आहे. योगामुळे शरीर आणि मन एकत्र आणतो आणि हा जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन आहे.

आज राष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण देशांमध्ये 35 लाख लोकांना एकाच वेळेस योगा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘योग करा स्वस्थ रहा, योग करा निरोगी रहा.’असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागारिकांना सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 150 देशांसोबत संयुक्त राष्ट्र संघामध्ये आज अमेरिकेत योगाभ्यास करणार आहेत.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.सर्वांनी योगसाधना करावी, असे आवाहन मोदींनी या वेळी केली. रोग होऊच नये, यासाठी योग शास्त्र प्रभावी उपाय आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.25 ते संध्याकाळी 6.30 वाजता संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

हे सुध्दा वाचा:

सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा गैरव्यवहार; अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

जुलै महिन्यात १५ दिवस बँका बंद राहणार

अभियंत्याला हसू आले, अन आमदार गीता जैन यांनी त्याचे गाल लाल केले….

या वर्षी, योग दिनाची थीम ‘ वसुधैव कुटुंबकम्साठी योग ‘ आहे. ज्याचा अनुवाद एक विश्व-एक कुटुंबाच्या रूपात सर्वांच्या कल्याणासाठी योग आहे. थीम योगाच्या एकत्रित भावनेवर भर देते, लोकांना एकत्र आणते. गतवर्षीप्रमाणेच देशभरात योगाचे कार्यक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी