35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रJharkhand Maoist Leader Arrest: 15 लाखांचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्याला महाराष्ट्र ATS...

Jharkhand Maoist Leader Arrest: 15 लाखांचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्याला महाराष्ट्र ATS ने केली अटक

45 वर्षीय यादव हा झारखंडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) सदस्य होता. तो वैदयकीय उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला होता. महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाला दीपक यादव पालघर जिल्हयातील नालासोपारा भागात राहत असल्याची माहिती मिळाली.

दीपक यादव (Deepak Yadav) उर्फ करू हुलास यादव नामक झारखंडमधील (Jharkhand) माओवादी नेत्याला (Maoist Leader) महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra ATS) रविवारी जेरबंद केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर माओवादी नेत्यावर झारखंड सरकारने 15 लाखांचे बक्षीस (Bounty) जाहीर केले होते. दहशतवाद विरोधी पथकाने दीपक यादवला महाराष्ट्रातील पालघर जिल्हयातून अटक केली. मोस्ट वॉन्टेडच्या गुन्हेगारांच्या (Most Wanted Criminal) यादीमध्ये त्याचा समावेश होता.

45 वर्षीय यादव हा झारखंडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) सदस्य होता. तो वैदयकीय उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आला होता. महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाला दीपक यादव पालघर जिल्हयातील नालासोपारा भागात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून यादवला नालासोपारा भागामधील एका चाळीतून अटक केले.

हे सुद्धा वाचा –

Virat Kohli Opener: ‘विराट कोहली टी-20 विश्वचषकामध्ये भारतीय डावाची सुरूवात करू शकतो’

Sharad Pawar : शरद पवारांनी केले पक्षांतील नाराज नेत्यांचे मनोमिलन

Nilu Phule : सुपरस्टार निळू फुले यांचा बायोपिक पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यादव उर्फ करू हुलास यादवच्या डावा पायाला दुखापत झाली होती. त्यावर वैदयकीय उपचार घेण्यासाठी तो नालासोपारा भागात मागील दोन महिन्यांपासून वास्तव्यास होता.

दीपक यादव हा 2004  सालापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) सक्रिय सदस्य होता. महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने त्याच्या अटकेची माहिती झारखंड पोलिसांना दिली आहे. झारखंड पोलिस त्याला त्यांच्या ताब्यात घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथक दीपक यादवला स्थानिक न्यायालयात हजर करून झारखंड पोलिसांना सुपूर्द करणार आहेत.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी