31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातल्या पत्रकारांसाठी जितेंद्र आव्हाड सरसावले, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

राज्यातल्या पत्रकारांसाठी जितेंद्र आव्हाड सरसावले, मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यातील पत्रकार कोरोनाच्या महामारीला सामोरे जात आहेत काल एका पत्रकाराचा मृत्यू झाला त्यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व पत्रकारांना लस देण्यात यावी यासाठी मागणी केली होती या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबद्दल लवकरच घोषणा करतील जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून लवकरच घोषणा

त्याशिवाय पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी, असेही त्यांनी ट्वीट करत सांगितले.

तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करा

जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसते आहेत. त्यामुळे १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

मुंबई, पुण्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरणाची नोंद

राज्यात गेल्या १ एप्रिलपासून ४५  वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्रात (3 एप्रिल) एकाच दिवशी ४ लाख ६२  हजार ७३५  नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले आहे. यात पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.

यात पुणे जिल्हा हा सर्वाधिक लस देणारा जिल्हा ठरला आहे. पुण्यात राज्यात सर्वाधिक ७६  हजार ५९४  जणांना कोरोना लस लस देण्यात आली. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (४६ हजार ९३७), नागपूर (४१ हजार ५५६), ठाणे (३३ हजार ४९०) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात दिवसाला ६ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे काल महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी