29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! कोल्हापुरात फक्त १६०० पिशव्या रक्त शिल्लक

धक्कादायक! कोल्हापुरात फक्त १६०० पिशव्या रक्त शिल्लक

टीम लय भारी

मुंबई :-  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्त पुरवठा आहे. तर कोल्हापुरात रक्तसाठ्यात केवळ १६०० रक्त पिशव्याच शिल्लक आहेत. त्यातच लस घेतल्यानंतर दात्यांना दोन महिने रक्तदान करता येत नसल्याने त्याचा थेट परिणाम कोल्हापूरच्या रक्तसाठ्यावर झाला आहे. या अनोख्या संकटामुळे कोल्हापूरच्या आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. केवळ आठ दिवस पुरेल इतका रक्त साठा शिल्लक आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयासह जिल्ह्यातील सामाजिक संस्थांमध्ये केवळ १६०० रक्त पिशव्या शिल्लक आहेत. सध्या कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास जिल्हा अग्रेसर आहे. दिवसभरात जवळपास १५  हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाते. लसीकरणानंतर संबंधित नागरिकाला दोन महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आहे, रक्तसाठ्यावर झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संभाव्य गरज लक्षात घेऊन रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

राज्यात ५-६ दिवस पुरेल एवढाच साठा

राज्यात केवळ ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे अन्न आणि औषध विभाग मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. खासगी संस्था आणि राजकीय नेत्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच राज्यात रेमडेसिव्हीर आणि इतर औषधांचा मुबलक साठा असल्याचंही त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी