35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणDrowning case : दुर्देवी! राजीवडा मांडवी समुद्रात बोट उलटल्याने पाच जण बुडाले

Drowning case : दुर्देवी! राजीवडा मांडवी समुद्रात बोट उलटल्याने पाच जण बुडाले

खाडी मुखाची रचना थोडी वेगळी आहे. खाडी मुखाशी एका बाजूला सॅण्ड बार आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठे खडक अशा चिंचोळ्या धोकादायक भागातून मच्छिमार प्रवास करतात, त्यामुळे बऱ्याचदा येथे अपघात घडतात. या अपघातानंतर आतातरी स्थानिक प्रशासन आतातरी याकडे लक्ष देणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

राजीवडा मांडवी समुद्रात बोट उलटल्याने पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. करार तत्वावर घेतलेली मासेमारी बोट मांडवी येथून जयगड येथे घेऊन जात असताना बोट मोठ्या लाटेत सापडली आणि उलटली. बोटीत पाच माणसे होती. बोट उलटल्याने पाचही जण बुडाले परंतु त्यांचा तात्काळ शोध घेतल्याने त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले मात्र त्यातील एकजण अद्याप बेपत्ता आहे. ओवेस मक्खी असे बेपत्ता असणाऱ्या व्यक्तीचे नाव असून इतर बोटींच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात येत आहे. मांडवी खाडी मुखाशी राजीवडा येथे ही मासेमारीची बोट बुडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नईम शेख (वय 21), उजेला मुल्ला वय (21), आफशान मेहबुब मुजावर (वय 22), ऐयाज माखजनकर (वय 38) हे चार जण वाचले आहेत, तर ओवेस मक्खी हा खलाशी अजूनही बेपत्ता आहे. सदर बुडालेली बोट ही इमरान सोलकर यांच्या मालकीची असून त्यांच्याकडून या पाचही जणांनी करारावर घेतली होती. दरम्यान ही बोट जयगडला घेऊन जात असताना अचानक मोठी लाट आली, लाटेचा मोठा फटका बसल्याने बोट उलटली आणि सगळेच खलाशी बुडाले.

हे सुद्धा वाचा…

Irrigation scam : काय आहे सिंचन घोटाळा ?

Mahadev Jankar : धनगर समाजातील मुलांना राज्य सरकारकडून मिळणार ‘या’ सवलती

Haribhau Rathod : हरिभाऊ राठोडांनी बदलली पार्टी, थेट ‘आम आदमी पार्टी’त प्रवेश

दरम्यान, तात्काळ शोधकार्य राबवल्याने बोटीतील चार खलाशांना वाचवण्यात यश आले, मात्र एक खलाशी अद्याप सापडला नाही, त्यामुळे इतर बोटीच्या साहाय्याने त्याचा शोध घेण्यात येत आहे. जयगड येथील हे पाच खलाशी सकाळी 10 च्या सुमारास राजीवाडा खाडीतून निघाले. खाडी मुखाजवळ येताच लाटेमुळे त्यांच्या बोटीला अपघात झाला.

खाडी मुखाची रचना थोडी वेगळी आहे. खाडी मुखाशी एका बाजूला सॅण्ड बार आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठे खडक अशा चिंचोळ्या धोकादायक भागातून मच्छिमार प्रवास करतात, त्यामुळे बऱ्याचदा येथे अपघात घडतात, शिवाय राजीवडा मांडवी खाडी मुखाशी गाळ सुद्धा साचत चालला आहे, वर्षानुवर्षे येथील गाळ काढला जात नसल्याने येथील भाग कमालीचा धोकादायक बनला आहे. या अपघातानंतर आतातरी स्थानिक प्रशासन आतातरी याकडे लक्ष देणार का की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करून ही गोष्ट टाळणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी