31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown2 : लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविला, नरेंद्र मोदींची घोषणा

Lockdown2 : लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविला, नरेंद्र मोदींची घोषणा

टीम लय भारी

मुंबई : अनेक राज्ये व सामान्य लोकांकडून ‘लॉकडाऊन’ ( Lockdown2 ) वाढविण्याबाबत सुचना येत होत्या. त्यामुळे 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येत असल्याची ( Narendra Modi announced Lockdown2 extended till 3 May) घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अगोदरच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ( Lockdown2 ) वाढविला होता. मोदी यांच्या घोषणेमुळे आता त्यात आणखी तीन दिवसांची भर पडली आहे.

पुढील एक आठवडा प्रत्येक भागांची कडक तपासणी केली जाईल. ज्या भागात ‘कोरोना’चा बिल्कूल संसर्ग झालेला नाही, त्या भागात 20 एप्रिलनंतर ‘लॉकडाऊन’ ( Lockdown2 ) काही प्रमाणात शिथील केला जाईल, असाही दिलासा पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात दिला.

Coronavirus

लोकांनी शिस्तीचे पालन करावे. आतापर्यंत जसे पालन केले तसेच येथून पुढेही काळजी घ्यावी. कोणीही घरातून बाहेर पडू नका. जिथे आहात तिथेच राहा. कोरोनाला कोणत्याही किंमतीत नवीन ठिकाणी पसरवू द्यायचे नाही. स्थानिक ठिकाणी एक जरी रूग्ण वाढला तरी तो चिंतेचा विषय असेल. कोरोनामुळे मृत्यू झाला तरी चिंता वाढेल.

‘कोरोना’चे हॉटस्पॉट निश्चित करून तिथे पहिल्यापेक्षाही खूप जास्त सतर्कता ( Lockdown2 ) बाळगावी लागेल. जी स्थाने हॉटस्पॉटमध्ये येऊ शकतील तिथेही खूप काळजी घ्यावी लागेल. नवे हॉटस्पॉट आणखी धोका वाढवतील. म्हणून पुढील 1 आठवडा लॉकडाऊनची ( Lockdown2 ) कठोरता वाढविली जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

येत्या 20 एप्रिल पर्यंत प्रत्येक ठिकाणी तपासणी केली जाईल. तिथे लॉकडाऊनचे ( Lockdown2 ) किती पालन झाले आहे. कोरोनाने किती वाचवले त्याचे मूल्यांकन केले जाईल. ज्या भागांत कोरोना वाढलेला नाही, तिथे लॉकडाऊन ( Lockdown2 ) सैल केला जाईल. पण तिथे कोरोनाचा रूग्ण आढळला तर दिलेली सवलत रद्द केली जाईल, असे मोदी यांनी सांगितले.

अनेक गोरगरीबांचे हातावर पोट आहे. या गोरगरीबांचा त्रास कमी व्हावा म्हणून 20 एप्रिलनंतर सवलत देण्याचा विचार केला आहे. लॉकडाऊनबाबतची उद्या विस्तृत अधिसूचना जारी केले जाईल, असे ही ते म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारतीय संविधानात ‘आम्ही भारताचे लोक’ असा उल्लेख आहे. हीच देशाची सामूहिक शक्ती आहे. सर्वांनी सामूहिक शक्तीचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना खरे नमन करूया. सर्व देशवासियांकडून मी डॉ. बाबासाहेबांना नमन करतो.

हा देश उत्सवांनी सतत भरलेला असतो. अनेक राज्यांमध्ये नवीन वर्षांची सुरूवात झाली आहे. तरीही लोक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत आहेत. लोक घरातच सन साजरा करीत आहेत. मी तुम्हाला व तुमच्या परिवाराच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.

आज जग कोरोनाने परेशान आहे. अनेक देशांच्या तुलनेत आपण कोरोनाला रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या वेळी आपणाकडे एक सुद्धा कोरोनाबाधित नव्हता, तेव्हाच परदेशातून येणाऱ्यांची चाचणी सुरू केली होती. ‘कोरोना’बाधितांची संख्या 100 संख्या झाली तेव्हा परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाला 14 दिवसांचे विलगीकरण सक्तीचे केले. मॉल, सार्वजनिक जागा नियंत्रित केल्या.

कोरोनाबाधितांची संख्या 550 झाली तेव्हा 21 दिवसांचा लॉकडाऊन केला. समस्या दिसताच त्वरीत फैसले घेतले गेले. कोणत्याही देशाशी तुलना करणे योग्य नाही. पण जगातील सामर्थ्यवान देशाशी तुलना केली तर भारत खूप सांभाळण्याच्या स्थितीत आहेत.

सुरूवातीला अनेक देश भारताच्या बरोबर होते. पण त्या देशांमध्ये भारताच्या तुलनेत 25 ते 30 पटीने ‘कोरोना’बाधित वाढले आहेत. सर्वसमावेश दृष्टीकोन भारताने ठेवला. त्वरीत निर्णय घेतले नसते तर याचा विचार करूनच अंगावार काटावर उभा राहतो.

सोशल डिस्टन्शिंग व लॉकडाऊनचा ( Lockdown2 ) लाभ देशाला मिळाला. आर्थिक दृष्टीकोनातून महागडा पडला. किंमत चुकवावी लागली. पण लोकांचे जीव तरी वाचले. भारत ज्या मार्गावर चालला आहे, त्याची चर्चा जगात सुरू आहे.

राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदारीने काम करीत आहेत. प्रत्येकजण परिस्थिती सांभाळत आहेत. पण तरीही ‘कोरोना’ ज्या पद्धतीने फैलावतोय, त्यामुळे जगातील वैद्यकीय तज्ज्ञांना व सरकारांना अधिक सतर्क केले असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठीही केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तो आणखी दिला जाईल. लोकांनी घरातील प्रत्येकाची काळजी घ्यावी. विशेषत: वयस्कर मंडळी व आजारी लोकांची काळजी घ्या. घराबाहेर बिल्कूल पडू नका, अशी सुचना मोदी यांनी यावेळी केली.

हे सुद्धा वाचा

Coronavirus राज्यात नवे 352 रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 2334

Police : ‘पोलिसांचे पगार 6 महिन्यांसाठी दुप्पट करा’

Coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुखांची तंबी, ‘सोशल मीडियाचा गैरवापर कराल तर याद राखा’

रतन टाटांच्या नावाने खोटे मेसेजस

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी