31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराजकारण्यांमुळे माणच्या विकासाचा खोळंबा

राजकारण्यांमुळे माणच्या विकासाचा खोळंबा

टीम लय भारी

वरकुटे- मलवडी :  दुष्काळी आणि टंचाईग्रस्त भाग म्हणून माण तालुक्याची ओळख आहे. माण तालुक्याच्या पुर्वभागातील नागरिकांची प्रगती स्वातंत्र्यापासून जशी होती तशीच आहे. सत्तेसाठी राजकारणाचा सारीपाट मांडणाऱ्या नेत्यांमुळेच माण तालुकाचा विकास गेल्या अनेक दशकांपासून रखडला. असे मत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केला (Maan taluka: Delays in Maan development due to politicians).

तसेच महाराष्ट्रात माण तालुक्याची ओळख दुष्काळी भाग म्हणून नाही तर, ओद्योगिकदृष्टया सबल असलेला व उद्योगधंद्यांचा भाग म्हणून ओळख असावी. परंतु, इथल्या राजकीय नेत्यांनी लोकांना नको त्या उद्योगात गुंतवून मतांसाठी जनतेचा वापर केला. असे मत जगताप यांनी मांडले.

माण तालुक्यातील वीर जवान सचिन विश्वनाथ काटे यांना कर्तव्य बजावत असताना आले वीरमरण

माण – खटावचा विकास ‘शिवराळ’ भाषेतून होणार नाही : वंचित बहुजन आघाडीने ठणकावले

एम. आय. डी. सी. छोटेमोटे उद्योगधंदे उभारून तरूणांना मदतीचा हात देण्याएवजी, राजकारणात तरुणांचा वापर करुन नेते स्वत: मोठे झाले आहेत. असे ही जगताप या वेळी म्हणाले.

माण तहसीलदार कार्यालयात मध्यस्थांचा सुळसुळाट

Maharashtra sees 686 Covid-19 cases, 19 deaths, 912 recoveries

वरकुटे- मलवडी, या माण येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचे भव्य स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात जगताप यांच्या बरोबर इतर मान्यवर मंडळी होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी