31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्याची शरद पवारांवर खरमरीत टीका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्याची शरद पवारांवर खरमरीत टीका

टीम लय भारी

नागपूर: जमावबंदी लागू असतानासुद्धा शरद पवार यांच्या सभेला संमती  देण्यात आली. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नाराजी दर्शवली आहे. नागपूर मध्ये १४४ धारा (जमावबंदी) असताना देखील शरद पवार यांनी बैठक कशी घेतली असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे(Swabhimani Shetkari Sanghatana leader criticizes Sharad Pawar)

ते पुढे असेही म्हणाले, “मोठ्या लोकांना त्यांच्या सभेसाठी परवानगी मिळते,मग आम्हाला का नाही मिळत परवानगी. अमरावती कारण असो किंवा कोविड, ते काय कोविड न होणारे जॅकेट घालून येतात का?” असा सवाल तुपकरांनी केला. पोलिसांची परवानगी नसतानाही रविकांत तुपकरांनी नागपूरातील संविधान चौकात आंदोलन सुरू केलं आहे.

Sharad Pawar : फडणवीस, राज ठाकरेंच्या सुरक्षेत क पात; शरद पवारांनी गृहमंत्र्यांना केला फोन

Sharad Pawar : शरद पवार, अजित पवारांचे तरूणांच्या कल्याणासाठी मोठे पाऊल

रविकांत तुपकरांनी राज्य सरकारच्या या धोरणावर टीका केली आहे. आता संमती नसताना पण आंदोलन करणाऱ्या तुपकरांवर प्रशासन काय कारवाई करते ते पाहणं रंजनकारक असणार आहे. रविकांत यांनी ‘बेमुदत अन्नत्याग आंदोलन’ सुरु केलं आहे. सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य ती किंमत मिळावी यासाठी त्यांनी हे अन्नत्याग आंदोलन पुकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

नागपूरमध्ये जमावबंदी लागू असूनही त्यांनी आंदोलन पुकारलं आहे ते होऊ नये  म्हणून पोलिसांनी रविकांत तुपकर यांना पत्र लिहिले आहे. मात्र तरीसुद्ध त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार आजपासून विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. नागपूरपासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. आज सकाळी ते नागपूरात येतील आणि शहरातील व्यायसायिकांसोबत चर्चा करतील.

Sharad Pawar : शरद पवारांनी रस्त्यावर गाडी थांबवून दिला नव वधू-वरांना आशिर्वाद !

Communal forces trying to take advantage of situation: NCP chief Sharad Pawar on Maharashtra violence

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी