31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय; घ्या जाणून

लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय; घ्या जाणून

लोकसभेचे बिगुल (Lok Sabha election) वाजायला अन् आचार संहिता लागण्यास अवघे काहीच तास उरले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना(maharashtra politics) वेग आला आहे. लोकसभा लागण्याआधी राज्यात मोठे निर्णय घेतले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंत्रीमंडळ बैठकीत १७ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत(Cabinet Meeting Decision) विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

लोकसभेचे बिगुल (Lok Sabha election) वाजायला अन् आचार संहिता लागण्यास अवघे काहीच तास उरले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना(maharashtra politics) वेग आला आहे. लोकसभा लागण्याआधी राज्यात मोठे निर्णय घेतले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंत्रीमंडळ बैठकीत १७ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

काय आहेत निर्णय घ्या जाणून

  • राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी
  • तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार
  • मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला
  • १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.
  • संस्कृत, तेलुगू, बंगाली, गोर बंजारा साहित्य अकादमी स्थापणार
  • शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण
  • विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. ५० कोटी भागभांडवल

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी PM मोदींनी देशवासीयांना दिली नवी गॅरंटी

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ.
  • हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार. रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली ‘मॅनहोलकडून मशीनहोल’ कडे योजना
    संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार.
  • सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार
  • राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
  • ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. ५० कोटी अनुदान
  • भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना धू धू धुतले !

  • संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार
  • वृद्ध साहित्यिक व कलाकारांना ५ हजार रुपये मानधन
  • राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी २० कोटी अतिरिक्त निधी मंजूर
  • श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी