28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमनोरंजनज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; लढवू शकतात लोकसभा निवडणूक

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; लढवू शकतात लोकसभा निवडणूक

प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या(Lok Sabha elections) तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधीच भाजपमध्ये (BJP )प्रवेश करत चाहत्यांना धक्का दिला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर अनुराधा पौडवाल लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी भाजपात प्रवेश केला. (Anuradha Paudwal noted Bollywood singer joins BJP before Lok Sabha elections)

प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या(Lok Sabha elections) तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधीच भाजपमध्ये (BJP )प्रवेश करत चाहत्यांना धक्का दिला आहे. त्यांच्या या प्रवेशानंतर अनुराधा पौडवाल लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव, मीडिया प्रमुख अनिल बालून आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी भाजपात प्रवेश केला. (Anuradha Paudwal noted Bollywood singer joins BJP before Lok Sabha elections)

लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारने घेतले मोठे निर्णय; घ्या जाणून

अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal)या त्यांच्या भक्तिगीतांसाठी खूप लोकप्रिय आहेत. अनुराधा पौडवाल(Anuradha Paudwal) त्यांच्या भक्तिगीत आणि चित्रपट गीतांमुळे प्रत्येक घराघरात ओळखल्या जातात. अशा स्थितीत लोकसभा निवडणूक-2024 मध्ये त्या पक्षाच्या स्टार प्रचारक ठरू शकतात.

पक्षप्रवेशानंतर अनुराधा यांनी आपले मत व्यक्त केले. ‘मला या गोष्टीचा आनंद आहे की मी अशा सरकारमध्ये भाग घेतेय, ज्याचा सनातन धर्माशी दृढ नातं आहे. आज मी भाजपात प्रवेश करतेय, हे माझं सुदैव आहे.’  आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता त्या पुढे म्हणाल्या, ‘मला त्याविषयी अद्याप काही माहीत नाही. वरिष्ठ नेतेमंडळी जे सांगतील ते मी करेन.’

इलेक्टोरल बॉन्डद्वारे भाजपने कसे कमवले करोडो रुपये? राहुल गांधींनी ४ मुद्द्यांमध्ये सांगितला मोदींचा फॉर्म्युला

अनुराधा पौडवाल यांच्यासंदर्भात….

अनुराधा (Anuradha Paudwal)या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी या भाषांमध्ये गायन केलंय. 1973 मध्ये ‘अभिमान’ या चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांतील गाण्यांसोबतच त्या भजनांसाठीही विशेष ओळखल्या जातात.

‘आशिकी’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘बेटा’ यांसारख्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. अनुराधा पौडवाल या गेल्या पाच दशकांपासून अधिक काळ गायनक्षेत्रात कार्यरत आहेत. गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, संस्कृत, बंगाली, तमिळ, तेलुगू, उडिया, आसामी, पंबाजी, भोजपुरी, नेपाळी आणि मैथिली यांसारख्या विविध भाषांमध्ये त्यांनी 9 हजारांहून अधिक गाणी दीड हजारांहून अधिक भजन रेकॉर्ड केले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी