28 C
Mumbai
Friday, July 26, 2024
Homeराजकीयलोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी PM मोदींनी देशवासीयांना दिली नवी गॅरंटी

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी PM मोदींनी देशवासीयांना दिली नवी गॅरंटी

लोकसभा २०२४ निवडणूक (loksabha elecation )आज जाहीर होणार असून दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद होणार आहे. देशातील सर्व पक्ष आपापला उमेदवार जाहीर करण्यात व्यस्त आहेत. बैठकांवर बैठका घेत आहेत. अशातच अवघे काही तास उरले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना खास पत्र लिहिलं आहे. या पत्रात पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi)नवी गॅरंटी दिली आहे. ज्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे. या पत्रात १० वर्षातील विकासकामांचा पाढा मोदींनी वाचला आहे.

काय म्हटले आहे पत्रात?

माझ्या प्रिय कुटुंबियांनो, तुम्ही मला साथ दिली त्याला आता एक दशक पूर्ण होत असून माझ्या १४० कोटी लोकांच्या विश्वास आणि समर्थनामुळे निर्माण झालेलं नातं विशेष आहे. या नात्याला शब्दामध्ये व्यक्त करणं अवघड आहे. देशातील कुटुंबियांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणं, ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे.

…तर 14 हजार कोटी कुठे गेले? इलेक्टोरल बॉण्डवर अमित शहांचा प्रश्न

आमच्या सरकारने शेतकरी, गरीब, युवक आणि महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी इमानदारीने काम केलं आहे. त्याचे परिणाम आज देशाला दिसून येत आहेत. सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना घरे, सर्वांसाठी वीज, पाणी आणि गॅसची योग्य व्यवस्था, आयुष्मान भारत योजनेतून उपचार व्यवस्था, मातृ वंदना योजनेतून माता-भगिनींना मदत अशा अनेक योजना राबविल्या आहेत.

तुमचा विश्वास आणि विश्वास माझ्या पाठीशी असल्यामुळेच यशस्वी होऊ शकलं आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) देशवासियांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांनी पत्रामध्ये जीएसटी, कलम ३७०, तीन तलाख, महिलांसाठीचं नारी शक्ती वंदन विधेयकाविषयी माहिती दिली.

इलेक्टोरल बॉण्ड खरेदी करणाऱ्या कंपन्यांवर अर्थमंत्री सीतारामन जरा स्पष्टच बोलल्या

जनभागीदारी आणि जनसहयोग लोकशाहीच सौंदर्य आहे. तुमचा विश्वास आणि सहकार्यामुळे देशहितसाठी मोठे निर्णय, मोठ्या योजना लागू करण्यासाठी शक्ती आणि ऊर्जा मला मिळाली. विकसित भारताच्या निर्माणाचा संकल्प घेऊन आपण पुढे जातोय. त्यासाठी मला तुमचे विचार, सूचना आणि सहकार्याची आवश्यकता आहे. तुमचा आशीर्वाद आणि समर्थन मला मिळत राहील. राष्ट्रनिर्माणसाठी न थकता प्रयत्न सुरु राहतील. ही मोदींची गारंटी आहे” असं मोदींनी () पत्रात लिहिलय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी