28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना धू धू धुतले !

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना धू धू धुतले !

लोकसभा निवडणूक (loksabha election) कार्यक्रम जाहीर होण्यासाठी काही तास उरले आहेत. राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडणून आणण्यासाठी कंबर कसत आहे. राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत (Arvind Sawant)यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांना पुन्हा चांगल्या मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)हे भाजपचे उमेदवार असले आणि प्रचाराला आल्यास त्यांना खरी शिवसेना कोणती, असा प्रश्न विचारा असं आव्हान ठाकरे यांनी मतदारांना केलं आहे.

लोकसभा निवडणूक (Loksabha election) कार्यक्रम जाहीर होण्यासाठी काही तास उरले आहेत. राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडणून आणण्यासाठी कंबर कसत आहे. राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत (Arvind Sawant)यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यांना पुन्हा चांगल्या मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)हे भाजपचे उमेदवार असले आणि प्रचाराला आल्यास त्यांना खरी शिवसेना कोणती, असा प्रश्न विचारा असं आव्हान ठाकरे यांनी मतदारांना केलं आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Loksabha election)अरविंद सावंत(Arvind Sawant) यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली.

‘शेवटच्या घटकाकडूनही गजर घडाळ्याचाच….’ सुनेत्रा पवारांची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आपल्या विरुद्ध उभे राहणारे आपल्यात होते, त्यानंतरत राष्ट्रवादीत गेले अन् आता भाजपमध्ये आहेत. त्यापुढे आता आणखी कुठे तरी जातील. आता तुमच्या वस्तित जेव्हा फिरायला येतील तेव्हा तुम्ही सांगायला हव त्यांना की, शिवसेना कोणाची?

…तर 14 हजार कोटी कुठे गेले? इलेक्टोरल बॉण्डवर अमित शहांचा प्रश्न

ज्या शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी दिलेलं नावं या चोरांनी बंद दाराआड कुणालाही न विचारता आपण सादर केलेल पुरावे बाजूला सारून शिवसेना गद्दारांच्या हातात दिली. आता हे जिथ जिथं उमेदवार म्हणून फिरतील त्यांना शिवसेना कोणाची सांग असा सवाल उपस्थित करा आणि माहिती नसेल तर आम्ही तुमचे डिपॉझिट जप्त करुन सांगू की शिवसेना कोणाची? अरविंद सावंत यांना पून्हा निवडून देऊ. असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची होणार आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्याकडून अरविंद सावंत यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मैदानात उतरणार आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि भाजपकडून मराठी आणि कोकणी मते स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे वारंवार लालबाग-परेल मध्ये बैठका घेत आहेत. तर राहुल नार्वेकर शेवटच्या टप्प्यात लालबाग परेल शिवडी वरळी मधील रखडलेली कामे मार्गी लावत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी