30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये पावसाची शक्यता , हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये पावसाची शक्यता , हवामान विभागाचा अंदाज

गेल्या आठ जून पासून सुरू झालेले मृग नक्षत्र कोरडे गेल्याने राज्यात चिंतेचे ढग निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. काही भागात ऊन तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. वातावरणात सातत्याने बदल होत आहे.या दिवसांत मशागत पूर्ण होऊन पेरणीची तयारी सुरु होत होती. मात्र पाऊस लांबल्याने मशागतही लांबली आणि पेरण्याही खोळबल्या आहेत. शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. राज्यात पुढच्या ३ दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मुंबईत 23 जूनला मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. तर 24 व 25 जूनला मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.कोकणात अकरा जून रोजी दाखल झालेल्या मोसमी पाऊस पुढच्या वाटचालीसाठी पोषक आहे. हे वारे हळूहळू वाटचाल करत आहे, असे हवामान विभागाचे महासंचालक होसाळीकर यांनी सांगितले आहे. मराठवाडामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगाम अडचणीत आला आहे. काही भागात धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत.

हे सुध्दा वाचा:

ज्या पेशव्यांनी होळकरांना त्रास दिला, त्याच पेशव्यांच्या टोप्या कशाला; छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

आव्हानाला सामोरे जाणे तुमचं-माझं कर्तव्यच नाही तर धर्म आहे; शरद पवारांनी फुंकले रणशिंग

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी धनंजय मुंडे आक्रमक; शिंदे-फडणवीसांना पाठवले पत्र

इतकेच नाहीतर सातारा, सांगली, बीड , सोलापूर, लातूर, नांदेड, नाशिक, अहमदनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर या ठिकाणी तीव्र उष्णता नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी